भारतीय गोगलगाय खाते; लेटलतिफ रेल्वेने साडेतीन वर्षांनंतर पोहोचवले खत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 03:47 PM2018-07-28T15:47:36+5:302018-07-28T15:48:20+5:30

बुलेट ट्रेनच्या वेगवान प्रवासाआधी सामान्य गाड्या, मालगाड्या वेळेवर पोहोचण्याइतपत तरी वेगाने धावतील का?

Indian Railway wagon reaches destination after 3.5 years | भारतीय गोगलगाय खाते; लेटलतिफ रेल्वेने साडेतीन वर्षांनंतर पोहोचवले खत

भारतीय गोगलगाय खाते; लेटलतिफ रेल्वेने साडेतीन वर्षांनंतर पोहोचवले खत

Next

नवी दिल्ली- एखादे पत्र चार वर्षांनी मिळाले, दहा वर्षांनी पुन्हा फिरुन पाठवणाऱ्या व्यक्तीकडे आले असल्या बातम्या पूर्वीच्या काळी येत असत. पोस्ट खात्याच्या कारभारावर तेव्हा टीका होत असे किंवा तो उपहासाचा विषय होत असे. मात्र भारतीय रेल्वेने मात्र यासर्वावर कडी करत एक विक्रम स्थापन केला आहे. 2014 साली पाठवलेले खत रेल्वेने संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले आहे. जपानमध्ये एका मिनिटाने ट्रेन लवकर किंवा उशिरा सुटली तर संपूर्ण खाते माफीनामा देते. पण भारतीय रेल्वेच्या विक्रमावर आता प्रतिक्रिया देणंही कठिण झाले आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही. आता हे खत खराब झाले असून त्याची भरपाई रेल्वेने द्यावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

Web Title: Indian Railway wagon reaches destination after 3.5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे