Indian Railways Boarding Station Rules: रेल्वेने महत्वाचा नियम बदलला; ट्रेन सुटण्यापूर्वी २४ तास आधी 'नाव' बदलू शकता...ते ही मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 02:11 PM2022-10-26T14:11:28+5:302022-10-26T14:11:49+5:30
अनेकदा काय होते, रेल्वेचे तिकीट आपण दोन तीन महिने आधी बुक करतो. तोवर अनेक घटना घडतात, कामानिमित्त आपले टाईमटेबल बदलते.
सध्याच्या घडीला सर्वात स्वस्त प्रवासाचे माध्यम म्हणज भारतीय रेल्वेच आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते तिकडे चेन्नईपर्यंत भारतीय रेल्वेचे जाळे पोहोचलेले आहे. या रेल्वेतून दररोज करोडो लोक प्रवास करतात. परंतू, एक असा नियम आहे जो प्रवाशांसाठी डोकेदुखीचा ठरत होता. तो देखील आता रेल्वेने काढून टाकला आहे. तुम्ही तुमचे तिकीट बुक झाले तरी बोर्डिंग स्टेशन बदलू शकणार आहात. यासाठी रेल्वे तुम्हाला कोणताही दंड आकारणार नाही. मात्र, यासाठी एकच अट ठेवण्यात आली आहे.
अनेकदा काय होते, रेल्वेचे तिकीट आपण दोन तीन महिने आधी बुक करतो. तोवर अनेक घटना घडतात, कामानिमित्त आपले टाईमटेबल बदलते. यामुळे तुम्हाला रेल्वे पकडण्याचे म्हणजेच बोर्डिंग स्टेशन लांब पडते. असे झाल्याने तुम्हाला रेल्वे पकडण्यासाठी त्या स्टेशनला जावे लागते. हा त्रास रेल्वेने कमी केला आहे. रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी तुम्ही तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकणार आहात, ते देखील मोफत.
बोर्डिंग स्टेशन बदलण्याची परवानगी आणि सुविधा फक्त त्या लोकांनाच देण्यात आली आहे, ज्यांनी IRCTC वेबसाइटच्या मदतीने ऑनलाइन तिकीट बुक केले आहे. एजंटमार्फत तिकीट बुक केल्यास ही सुविधा दिली जाणार नाही. तसेच VIKALP पर्यायाच्या मदतीने बुक केलेल्या तिकिटांवर बोर्डिंगची सुविधा उपलब्ध होणार नाही.
कसे कराल तुमचे बोर्डिंग स्टेशन चेंज...
- प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in/nget/train वर जा.
- लॉग इन करा आणि पासवर्ड टाकून ‘Booking Ticket History’ पर्यायावर जा.
- त्यानंतर तुम्हाला ट्रेनचा बोर्डिंग पॉइंट बदलण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्याकडून काही माहिती घेतली जाईल, जी तुम्हाला द्याव लागेल.
- तुम्हाला जे स्टेशन हवे आहे त्या नवीन रेल्वे स्थानकाचे नाव टाकून सबमिट करा.