Indian Railway : भारतीय रेल्वेच्या आज 300 हून अधिक गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:34 AM2020-01-13T10:34:18+5:302020-01-13T10:36:37+5:30
Indian Railways IRCTC cancelled trains list: रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी पाहू शकता
भारतीय रेल्वेने आज (दि.13) अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेने विविध कारणांसाठी या गाड्या केल्या आहेत, यामध्ये एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांसोबत काही स्पेशल गाड्यांचा सुद्धा समावेश आहे. रेल्वेने आज सरासरी 313 गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल, तर तुमची सुद्धा रेल्वे रद्द करण्यात आली आहे की नाही, ते पाहा...
काही गाड्यांची स्थितीबाबत आम्ही माहिती देत आहोत. बाकीच्या गाड्यांची माहिती तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅप National Train Enquiry System (NTES) वर रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी पाहू शकता.
दिल्लीत येणाऱ्या 15 गाड्या आज 2 ते 5 तास उशिराने धावत आहेत. रेल्वेच्या माहितीनुसार, जास्तकरून गाड्या लांब पल्याच्या आहेत. हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगना एक्स्प्रेस सर्वाधिक जास्त उशिराने धावत आहे. अशात आपण रेल्वेच्या अधिकृत अॅपच्या माध्यमातून गाड्यांची योग्यवेळ किंवा वेळापत्रक पाहू शकता.