Indian Railway : भारतीय रेल्वेच्या आज 500 हून अधिक गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:20 AM2020-01-17T09:20:11+5:302020-01-17T09:20:45+5:30
Indian Railways IRCTC cancelled trains list: रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी पाहू शकता
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) आज 500 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये अनेक गाड्यांची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर काही गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार, या गाड्या खराब हवामानामुळे किंवा विविध कारणांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांसोबत काही स्पेशल गाड्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल, तर तुमची सुद्धा रेल्वे रद्द करण्यात आली आहे की नाही, ते पाहा...
शुक्रवारी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, 352 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर 161 गाड्या काहीकाळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, 22 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
काही गाड्यांची स्थितीबाबत आम्ही माहिती देत आहोत. बाकीच्या गाड्यांची माहिती तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/ntes/ किंवा मोबाइल अॅप National Train Enquiry System (NTES) वर रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी पाहू शकता.
आणखी बातम्या..
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे
इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता?