Indian Railways: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! 'या' रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले, प्रवासापूर्वी यादी तपासा…
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 04:16 PM2021-06-01T16:16:33+5:302021-06-01T16:47:05+5:30
Indian Railways: उत्तर रेल्वेने (Northern Railway) मालवा सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल स्पेशलचे वेळापत्रक बदलले आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railways) कोरोना कालावधीत प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्यांची संख्या वाढवत आणि कमी करीत आहे. त्याचबरोबर अशा अनेक विशेष गाड्या वाढविण्यात आल्या आहेत. यादरम्यान आता उत्तर रेल्वेने (Northern Railway) मालवा सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल स्पेशलचे वेळापत्रक बदलले आहे. उत्तर रेल्वेने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. (indian railways change timing malwa superfast special express and mumbai central amritsar golden temple special check details)
रेल्वेचे ट्विट
सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे की, ट्रेन क्रमांक 02919/20 मालवा सुपरफास्ट -स्पेशल एक्सप्रेस (वास्तविक ट्रेन क्रमांक 12919/20) आणि ट्रेन क्रमांक 02903/04 मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल स्पेशल (वास्तविक ट्रेन क्रमांक 12903/04) ) वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे .
सर्वसंबंधित को सूचित किया जाता है कि ट्रैन न. 02919/20 मालवा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (वास्तविक ट्रैन न. 12919/20) और रेलगाड़ी संख्या 02903/04 मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल स्पेशल (वास्तविक ट्रैन न. 12903/04) की समय-सारणी में निम्नानुसार संशोधन करने का निर्णय लिया गया हैः- pic.twitter.com/ZuyApfTDuI
— Northern Railway (@RailwayNorthern) May 31, 2021
या ट्रेन रद्द
उत्तर रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक 05483/05484 अलीपुरद्वार-दिल्ली जंक्शन-अलिपुर (05483/05484 Alipurdwar- Delhi Jn.-Alipurduar) आणि 05733/05734 कटिहार-अमृतसर-कटिहार (Katihar- Amritsar- Katihar) स्पेशन ट्रेन 1 जून 2021 पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू https://t.co/Pc9IOtrAhi#Punjab#congress
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021
रेल्वेत ३३७८ पदांची भरती; दहावी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी
भारतीय रेल्वेने दक्षिण रेल्वे विभागातंर्गत अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर sr.indianrailways.gov.in जाऊन अर्ज देऊ शकतात. १ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ३० जूनला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. याचसोबत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार थेट https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,16 या लिंकवर जाऊन पदांसाठी अर्ज करू शकतात. या जाहिरातीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontcolor=black&backgroundColor=LIGHTSTE ही लिंक पाहू शकता. या भरतीअंतर्गत ३ हजार ३७८ जागा भरल्या जाणार आहेत.