भारतीय रेल्वेचं मोठ्ठं यश! EDFC चा मेगा प्रकल्प झाला पूर्ण, प्रवाशांना होणारा कमालीचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:06 PM2023-10-13T22:06:41+5:302023-10-13T22:07:01+5:30
चार राज्यांसाठी ठरणार फायदेशीर, जाणून घ्या काय आहे EDFC प्रकल्प?
Indian Railway EDFC: देशातील मालवाहतुकीसाठी तयार होत असलेल्या सर्वात मोठ्या रेल्वे मार्गाचे म्हणजेच समर्पित फ्रेट कॉरिडॉरचे (Dedicated Freight Corridor) बांधकाम वेगाने पूर्ण झाले. भारतीय रेल्वेने उद्योगांना आश्वासन दिले होते की याद्वारे त्यांचा माल एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज आणि वेगाने पोहोचू शकेल. तो दिवस अखेर आता आला. भारतीय रेल्वेच्या DFC कॉरिडॉरचा ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (EDFC) आता 100% तयार आहे. EDFC पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील सोननगरला जाते. देशातील या अतिशय खास कॉरिडॉरची लांबी 1337 किमी आहे. EDFC 51 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. मालवाहतुक सुकर होण्याने प्रवाशांना फायदा कसा मिळेल, याबद्दलही समजून घेऊया.
या चार राज्यांना फायदा होईल
या उपक्रमामुळे वीजगृहांना कोळशाचा पुरवठा जलद होईल. EDFC दररोज 140 मालगाड्या चालवणार आहे, त्यापैकी 70% कोळशाच्या गाड्या आहेत. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या वीज प्रकल्पांना याचा फायदा होणार आहे. रेल्वेच्या पश्चिम कॉरिडॉरचेही ७० टक्के काम पूर्ण झाले आहे, जे या आर्थिक वर्षात ९५ टक्के पूर्ण होईल, अशी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेचा पश्चिम कॉरिडॉर खुर्जा ते जेएनपीटी मुंबईपर्यंत बांधला जात आहे.
मालगाड्या सामान्य ट्रॅकच्या दुप्पट वेगाने धावतील म्हणजेच सरासरी वेग ताशी 50 किलोमीटर. सध्या रेल्वेतील मालगाड्यांचा सरासरी वेग ताशी २५ किलोमीटर आहे, म्हणजेच एका तासात त्या केवळ २५ किलोमीटर धावू शकतात.
पॅसेंजर गाड्यांनाही कसा होणार फायदा?
या कॉरिडॉरवर फक्त मालगाड्याच धावतील परंतु प्रवासी गाड्यांनाही याचा फायदा होईल कारण मालगाड्या सामान्य रेल्वे रुळांवरून चालवल्या जातील आणि रुळावरील ताण कमी झाल्यामुळे प्रवासी गाड्याही अधिक वेगाने धावतील आणि प्रवाशांना वेळेवर पोहोचवतील. पॅसेंजर ट्रेन ट्रॅकवरून मालगाड्या कमी केल्या जातील, ज्यामुळे पॅसेंजर गाड्यांची वक्तशीरपणा वाढेल आणि नवीन पॅसेंजर ट्रेनसाठी ट्रॅक क्षमता देखील वाढेल. तुमच्या गाड्या वेळेवर येतील आणि तुमच्या गंतव्यस्थानी वेळेवर सुरक्षितपणे पोहोचतील हे स्पष्ट आहे.