Agneepath Agneeveer Protest : 'अग्निपथ'वरून जाळपोळ: रेल्वेचं तब्बल २०० कोटी रुपयांचं नुकसान; ५० डबे, ५ इंजिनं जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:47 PM2022-06-18T19:47:17+5:302022-06-18T19:47:41+5:30
Agneepath Agneeveer Protest : मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरूच आहे. हे आंदोलन बिहारमधून सुरू करण्यात आले होते, त्यामुळे सर्वाधिक नुकसान त्याच ठिकाणी झाले आहे.
मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरूच आहे. हे आंदोलन बिहारमधून सुरू करण्यात आले होते, त्यामुळे सर्वाधिक नुकसान त्याच ठिकाणी झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहार सरकारने १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली होती, मात्र परिस्थिती अजूनही तशीच आहे. या आंदोलनात रेल्वेच्या मालमत्तेचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
“रेल्वे परिसरात झालेल्या तोडफोडीच्या घटनांमध्ये २०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलकांनी रेल्वेचे ५० डबे आणि ५ इंजिने जाळली, ज्यांचं आता पूर्णपणे नुकसान झालं आहे. याशिवाय आंदोलकांनी प्लॅटफॉर्म, कम्प्युटर्स आणि इतर अनेक उपकरणांचे नुकसान केले आगे. या आंदोलनामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती दानापूर रेल्वे विभागाचे डीआरएम प्रभात कुमार म्हणाले यांनी दिली.
बिहारच्या ट्रेन सेवा रद्द
बिहारमधील रेल्वे सेवा शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत तसंच रविवारीही पहाटे ४ ते रात्री ८ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले, तर या आंदोलनामुळे आतापर्यंत ३५० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच तेथे उपस्थित असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने नुकसान करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
Bihar | Vandalism incidents in railway premises have led to losses of over Rs.200 crore, 50 coaches & 5 engines completely burnt & went out of service. Platforms, computers & various technical parts damaged. Some trains were cancelled:Prabhat Kumar, DRM, Danapur Rail Division pic.twitter.com/38cC4gzc4s
— ANI (@ANI) June 18, 2022
भाजप, जदयू आमनेसामने
आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अग्निपथ योजनेला स्पष्टपणे विरोध केलेला नाही. परंतु त्यांच्या पक्षातील अनेक नेते केंद्र सरकारकडे योजनेचा पुनर्विचार करण्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी आंदोलकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घराची तोडफोड केली. त्यामुळे भाजप आणि जदयूमध्ये संघर्ष सुरू आहे.