Indian Railway: 'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 06:11 PM2022-06-05T18:11:05+5:302022-06-05T18:11:24+5:30

Indian Railways: दक्षिण रेल्वे समुद्रामार्गे जाणारा एक आधुनिक पूल बांधणार आहे. यामुळे रामेश्वर ते धनुषकोडी अंतर आणखी जवळ होईल.

Indian Railways: Indian Railways plans for 'Ram-Setu', train running at 80 kmph at sea | Indian Railway: 'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन

Indian Railway: 'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन

Next

Indian Railways: भारतीय रेल्वे वेळोवेळी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक बदल करत आहे. देशात रेल्वेने अनेक भव्य पूल बांधले आहेत, ज्यांची जगभरात वेगळी ओळख आहे. असाच एक पूल दक्षिण रेल्वे बांधत आहे. हा पूल पाण्याचे जहाज जवळ आल्यावर पाण्यावरुन वर येईल. रामेश्वरमला जाणारे भाविक येत्या काळात या अभियांत्रिकी आश्चर्याचे साक्षीदार होतील. सुमारे 560 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पंबन पुलावर लिफ्ट सिस्टिम वापरून ट्रॅक टाकण्यात येणार असून, त्यावरून ताशी 80 किमी वेगाने ट्रेन धावणार आहे.

धनुषकोडीसाठी पुन्हा रेल्वे मार्ग सुरू होईल
रामेश्वरम आणि धनुषकोडी यांना पुन्हा एकदा रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. यातून रामेश्वरमला भेट देणाऱ्या पर्यटकांना धनुषकोडीला जाण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होईल. या पुलाच्या निर्मितीमुळे रेल्वेला रामेश्वरमपर्यंत अनेक नवीन गाड्या चालवता येणार आहेत.

समुद्री वादळात रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाला होता
धनुषकोडीमध्ये पूर्वी एक रेल्वे स्टेशन होते, तेथून पुढे श्रीलंकेला माल जात असे. पण साठच्या दशकात आलेल्या भीषण सागरी वादळात हे रेल्वे स्थानक आणि रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाला. तेव्हापासून ते बनवण्यात कोणीही रस दाखवला नाही. साठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ही रेल्वे लाईन सुरू होणार आहे. या स्थानकाला पर्यटन आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

18 किमी रेल्वे मार्ग
मदुराई विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आनंद यांच्या मते, रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करून ते नवीन ब्रॉडगेज आणि इलेक्ट्रिक लाईन्सने जोडण्याची योजना आखत आहे. ही रामेश्वरमपासून 18 किमीची लाईन असेल आणि तिला 3 थांबे असतील. यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्या असलेला पूल 120 वर्षे जुना असल्याने सध्या या पुलावरून केवळ डझनभर गाड्या जातात. त्याचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका आहे. एवढेच नाही तर जुन्या पंबन पुलावरून मालगाड्याही धावत नाहीत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने पंबन पुलासह नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

लिफ्ट सिस्टम वापरुन पुलाची पुनर्बांधणी केली जाणार
समुद्रातून जहाज आल्यावर पूल आपोआप वर जाईल यासाठी लिफ्ट सिस्टिम वापरून पंबन पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. या आधी बांधलेल्या पुलांना स्वतंत्र ट्रॅक असायचे. जहाज आल्यानंतर ट्रॅक वर जायचे आणि जहाज गेल्यावर पुन्हा एकमेकांशी जोडायचे. याला सुमारे अर्धा तास लागत असे. पण, आता पंबन पुलातील लिफ्ट सिस्टिमचा वापर केल्यानंतर जहाज आल्यानंतर ट्रॅक लिफ्टप्रमाणे वर जातील आणि जहाज सुटल्यानंतर जागेवर परत येतील. या प्रक्रियेस फक्त 10 मिनिटे लागतील. विशेष म्हणजे, जुना पंबन पूल समुद्राच्या मध्यभागी बांधला गेला आहे.

धनुषकोडीला पोहोचणे सोपे होईल
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, धनुषकोडी ते रामेश्वरमपर्यंत 18 किमी, सिंगल लाइन रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे. यामुळे रामेश्वरमला भेट देणाऱ्या पर्यटकांना धनुषकोडीला जाण्याचा सोपा पर्याय उपलब्ध होईल. राम-सेतू रामेश्वरमपासून सुरू होतो. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राजवळ बांधले जाणारे हे रेल्वे स्थानक खास असेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प 700 कोटी रुपये खर्चून पूर्ण केला जाणार असून, 18 किमीपैकी 13 किमीचा रेल्वे ट्रॅक एलिव्हेटेड असेल. 

Web Title: Indian Railways: Indian Railways plans for 'Ram-Setu', train running at 80 kmph at sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.