आदर्श रेल्वेस्थानकांमध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशाला सर्वाधिक फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 11:55 AM2018-08-10T11:55:59+5:302018-08-10T11:56:29+5:30
आदर्श रेल्वे स्थानकांसाठी निवडण्यात आलेल्या स्थानकांच्या यादीत उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
नवी दिल्ली- गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीयरेल्वे स्थानकांचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी आदर्श रेल्वेस्थानक योजनेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील काही स्थानके निवडण्यात आली आहे. रेल्वेराज्यमंत्री राजन गोहेन यांनी रेल्वेस्थानकांच्या विकासाबाबत लोकसभेत लेखी उत्तर सादर केले आहे.
या उत्तरात गोहेन यांनी देशात सर्वत्र चाललेल्या रेल्वेस्थानक विकासकामांची प्रगती दिली आहे. स्थानकांवर गरजांच्या आवश्यकतेनुसार व सध्या उपलब्ध असणाऱ्या सुविधांमध्ये वृद्धी करण्याच्या अनुषंगाने स्थानकांची निवड करण्यात आली आहे. आदर्श रेल्वे स्थानक योजनेत रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी वेगळा निधी देण्यात आलेला नाही. या योजनेमध्ये 1253 स्थानकांची निवड झाली असून पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधीक स्थानके या यादीत आहेत. प्रत्येक राज्यातील किती स्थानकांची निवड यासाठी झाली याची यादीही सादर करण्यात आलेली आहे.
आंध्र प्रदेश- 46 स्थानके
आसाम- 28 स्थानके
बिहार- 59 स्थानके
छत्तिसगड- 17 स्थानके
दिल्ली- 4 स्थानके
गोवा- 2 स्थानके
गुजरात- 32 स्थानके
हरियाणा- 16 स्थानके
हिमाचल प्रदेश- 2 स्थानके
जम्मू आणि काश्मीर- 5 स्थानके
झारखंड- 29 स्थानके
कर्नाटक - 44 स्थानके
केरळ- 75 स्थानके
मध्य प्रदेश - 44 स्थानके
महाराष्ट्र- 108 स्थानके
नागालँड- 1 स्थानक
ओडिशा- 47 स्थानके
पुदुच्चेरी- 2 स्थानके
पंजाब- 32 स्थानके
राजस्थान- 40 स्थानके
तेलंगण- 25 स्थानके
तामिळनाडू- 50 स्थानके
त्रिपुरा- 1 स्थानक
उत्तर प्रदेश- 152 स्थानके
उत्तराखंड- 8 स्थानके
पश्चिम बंगाल- 384 स्थानके