Indian Railway: रेल्वेने दिला सक्त इशारा, प्रवासामध्ये केली ही चूक तर होईल तुरुंगवास, भरावा लागेल जबर दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 05:07 PM2022-04-23T17:07:04+5:302022-04-23T17:07:59+5:30

Indian Railway News: भारतीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वापूर्ण माहिती आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी करून प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेसाठी सक्ती दाखवली आहे.

Indian Railways: Strict warning issued by Railways to passenger | Indian Railway: रेल्वेने दिला सक्त इशारा, प्रवासामध्ये केली ही चूक तर होईल तुरुंगवास, भरावा लागेल जबर दंड

Indian Railway: रेल्वेने दिला सक्त इशारा, प्रवासामध्ये केली ही चूक तर होईल तुरुंगवास, भरावा लागेल जबर दंड

Next

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वापूर्ण माहिती आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी करून प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेसाठी सक्ती दाखवली आहे.

रेल्वेने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेने ट्विट करून सांगितले की, ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांनी ज्वालाग्राही पदार्थ स्वतःसोबत नेऊ नये. तसेच इतरांनाही नेऊ देऊ नयेत. असे पदार्थ नेणे हा दंडनीय अपराध आहे. जर कुणी प्रवासी असा प्रवास करताना सापडला तर त्याला कायदेशीर कारवाईसोबतच तुरुंगवासाचा सामना करावा लागेल.

पश्चिम मध्य रेल्वेने सांगितले की, ट्रेनमध्ये आग पसरवणे किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे हा रेल्वे अधिनियम, १९८९च्या कलम १६४ अंतर्गत दंडनीय अपराध आहे. त्यानुसार पकडलेल्या व्यक्तीला ३ वर्षांपर्यंत  तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. रेल्वेकडून जारी केलेल्या आदेशानुसार आता प्रवासी आता ट्रेनच्या डब्यामध्ये रॉकेल, सुके गवत, स्टोव्ह, पेट्रोल,  पेट्रोल, गँस सिलेंडर, माचिस, फटाके किंवा अन्य ज्वालाग्राही वस्तू सोबत घेऊन तुम्ही प्रवास करू शकत नाही. रेल्वेने ही सक्ती दाखवली आहे.

रेल्वे प्रवासाप्रमाणेच रेल्वे परिसरात आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेकडून तयार केलेल्या योजनेनुसार कुठलाही प्रवासी रेल्वे परिसरात स्मोकिंग करू शकत नाही. जर असे करताना कुणी सापडले तर त्याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच प्रवाशांना दंडात्मक कारवाईचाही सामना करावा लागू शकतो
 

Web Title: Indian Railways: Strict warning issued by Railways to passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.