८७ वर्षानंतर दरभंगा मार्गावर धावणार ट्रेन; १९३४ च्या भूकंपावेळी उद्ध्वस्त झाला होता रेल्वे मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 06:16 PM2021-03-13T18:16:57+5:302021-03-13T18:17:25+5:30
८७ वर्षांनी निर्मली ते सरायगड रेल्वे मार्ग तयार झाला आहे, या प्रकारे कोसी आणि मिथिलांचल दरम्यान रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे
समस्तीपूर रेल्वे विभागाच्या सहरसा-सरायगड-झंझारपूर-दरभंगा रेल्वे मार्गावर १९३४ नंतर आज शनिवारी स्पीड ट्रायल ट्रेनची चाचणी झाली, जवळपास ८७ वर्षांनी याठिकाणी रेल्वे धावली, पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी सांगितले की, कोसी रेल्वे पूल व्हाया सुपौल-सरायगड-निर्मली-झंझारपूर करत सहरसा आणि दरभंगा रेल्वे मार्गावर ट्रॅक, रेल्वे पूल आणि रेल्वे स्टेशनचा आज रेल्वे महासंचालकांनी आढावा घेतला.
८७ वर्षांनी निर्मली ते सरायगड रेल्वे मार्ग तयार झाला आहे, या प्रकारे कोसी आणि मिथिलांचल दरम्यान रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, पूर्व मध्य रेल्वे जीएम ललित चंद्र त्रिवेदी यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२० मध्ये देशाचे पंतप्रधान कोसी पूल राष्ट्राला सर्मपित केला होता, त्यावेळी कोसी आणि मिथिलांचलच्या लोकांना अपेक्षा होती की, रेल्वे सेवा सरळ जोडण्यात येईल.
समस्तीपूर विभागाच्या आसनपूर कुपहा निर्मली-झंझारपूर रेल्वे विभागाकडून स्पीड ट्रायल घेतलं जातं आहे, कोसी ते मिथिलांचल जोडणारा आसनपूर-कुपहा निर्मली झंझारपूर विद्युत परिवर्तनाचं काम पूर्ण होत आलं आहे, त्यामुळेच दोन दिवसांपासून स्पीड ट्रायल केले जात आहे. समस्तीपूर रेल्वे विभागाचे मीडिया प्रभारी सरस्वती चंद्र यांनी सांगितले की, विभागाचे महासंचालक ललित त्रिवेदी यांनी शनिवारी याचा आढावा घेतला. त्यानंतर सीआरएस निरीक्षण होणं बाकी आहे, चाचणीच्या निरीक्षणानंतर हिरवा कंदील मिळताच प्रवाशांना ट्रेनचा प्रवास करता येणार आहे.
समस्तीपूर रेल्वे विभागाच्या सहरसा स्टेशनच्या कोंचिग डेपोमध्ये ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्लांटचा शुभारंभ जीएम ललित त्रिवेदी यांच्या हस्ते झाला आहे. स्वच्छता अभियानातंर्गत रेल्वेने स्वच्छतेवर भर दिला आहे. या वॉशिंग प्लांटमुळे अर्ध्या तासात रेल्वेचे डबे चांगल्यारित्या साफ होणार आहेत.