भारतीय-रशियन जोडप्याच्या विवाहात महापालिका बनली व्हिलन
By admin | Published: April 17, 2017 02:28 PM2017-04-17T14:28:09+5:302017-04-17T14:50:13+5:30
हरियाणा महापालिकेच्या संथ कारभारामुळे मोहीत राणा आणि त्यांच्या रशियन पत्नीला सातासमुद्रापार परस्परांपासून दूर रहावे लागत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 17 - कायदेशीर विवाह केल्यानंतरही हरियाणा महापालिकेच्या संथ कारभारामुळे मोहीत राणा आणि त्यांच्या रशियन पत्नीला सातासमुद्रापार परस्परांपासून दूर रहावे लागत आहे. पंचकुला येथे रहाणारे मोहित राणा आणि रशियन नागरीक अयगुल राखीमकुलोव्हा यांनी पाचवर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर 21 जानेवारी 2017 रोजी झिरकापूर येथे विवाह केला.
जवळपास 500 पाहुणे या लग्नाला उपस्थित होते. हरयाणाच्या विवाह कायद्यानुसार त्यांनी 24 जानेवारीला पंचकुला महापालिकेकडे मॅरेज सर्टीफिकेटसाठी अर्ज केला. अयगुलच्या आई आणि भावाने साक्षीदार म्हणून अर्जावर स्वाक्षरी केली. पण पंचकुला महापालिकेच्या संथ कारभारामुळे अजूनही त्यांना मॅरेज सर्टीफिकेट मिळालेले नाही.
त्यामुळे मोहित चिली सँटींगोमध्ये तर पत्नी जर्मनीमध्ये आहे. दोघेही न्यूरोशास्त्रज्ञ आहेत. मॅरेज सर्टीफिकेट न मिळाल्यामुळे मोहित यांना स्वत:सोबत पत्नीला सँटींगो येथे नेता आलेले नाही. अयगुल जर्मनीमध्ये पीचडीचा अभ्यास करत आहे. मोहित सँटीगोमध्ये स्थायिक झाले आहेत.