38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 09:14 PM2022-08-14T21:14:19+5:302022-08-14T21:15:57+5:30

1984 मध्ये सियाचिन ग्लेशियरमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली एक टीम हिमस्खलनानत बेपत्ता झाली होती. त्यातील एका जवानाचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे.

Indian Soldier's body found after 38 years; Martyred during Operation 'Meghdoot' in siachen | 38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

Next

नवी दिल्ली: सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र स्वातंत्रदिनाची धामधुम आहे. पण, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सियाचीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन मेघदूतमध्ये शहीद झालेले लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला (बॅच क्रमांक 5164584) यांचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे. 13 ऑगस्ट रोजी एका जुन्या बंकरमध्ये हरबोला यांचा मृतदेह सापडला. सोमवारी किंवा मंगळवारी त्यांचे पार्थिव हल्द्वानी येथील घरी पोहोचेल.

लान्स नाईक चंद्रशेखर हे त्या टीमचा भाग होते, ज्यांना पॉइंट 5965 कॅप्चर करण्याचे काम देण्यात आले होते. त्यावर पाकिस्तानची नजर होती. ऑपरेशन मेघदूत दरम्यान अनेक सैनिकांना हिमस्खलनाचा फटका बसला होता. यापैकी अनेकांचे अवशेष यापूर्वीच सापडले होते पण, चंद्रशेखर हरबोला आणि एका जवानाचा मृतदेह सापडला नव्हता. तो आता तब्बल 38 वर्षांनंतर सापडला आहे.

13 ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला 
ऑपरेशन मेघदूतमध्ये टीमचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट पीएस पुंडिर यांच्यासह 18 भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले होते. यापूर्वी 14 जवानांचे मृतदेह सापडले, तर पाच बेपत्ता आहेत. यापैकी लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांचा मृतदेह 13 ऑगस्ट रोजी सियाचीनमध्ये 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर एका बंकरमध्ये सापडला आहे. त्यांच्या शरीराचा आता सांगाडा झाला आहे. अवशेषांसह सैन्य क्रमांक असलेली डिस्कदेखील सापडली, ज्यावरून मृतदेहाची ओळख पटली. ही माहिती ऐकून हरबोलांच्या कुटुंबात दुःख आणि आनंद दोन्ही आहे. 

आजही लोक सैनिकांचे शौर्य विसरलेले नाहीत
ऑपरेशन मेघदूतमधील जवानांचे शौर्य आणि अदम्य साहस आजही लोक विसरलेले नाहीत. जगातील सर्वात दुर्गम रणांगणावर भारतीय जवानांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. भारतीय लष्कराने 13 एप्रिल 1984 रोजी सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशन मेघदूत राबवले होते.

Web Title: Indian Soldier's body found after 38 years; Martyred during Operation 'Meghdoot' in siachen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.