श्रीहरीकोटा येथून इस्त्रोची शंभरावी गगनभरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 08:03 AM2018-01-12T08:03:35+5:302018-01-12T12:21:30+5:30

अंतराळ विश्वात भारतानं नवा इतिहास रचला आहे.  

Indian Space Research Organisation to launch Cartosat-2 Series satellite on PSLV rocket from Sriharikota in Andhra Pradesh | श्रीहरीकोटा येथून इस्त्रोची शंभरावी गगनभरारी

श्रीहरीकोटा येथून इस्त्रोची शंभरावी गगनभरारी

googlenewsNext

बंगळुरू  - अंतराळ विश्वात भारतानं नवा इतिहास रचला आहे.  आज इस्त्रोनं उपग्रह पाठवण्याचं शतक पूर्ण केले आहे.  भारताचा 100 वा उपग्रह इस्त्रो शुक्रवारी सकाळी (12 जानेवारी) श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला आहे. पीएसएलव्ही सी 40 या अग्निबाणाच्या सहाय्यानं कार्टोसॅट 2 मालिकेतील उपग्रह अवकाशात भरारी घेतली.  

शुक्रवार सकाळी 9.28 वाजता एकत्र 31 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये 3 भारतीय व 28 परदेशी उपग्रहांचा समावेश आहे. यात कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.  'कार्टोसॅट-2' या उपग्रहाचाही समावेश आहे. अमेरिकेचे 19, दक्षिक कोरियाचे 5 आणि कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलँडचे प्रत्येकी 1 उपग्रहाचा समावेश आहे.  

खासगी क्षेत्राच्या सहभागातून बनवलेला पहिला भारतीय उपग्रह आयआरएनएसएस- 1 एच हा प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न चार महिन्यांपूर्वी अयशस्वी ठरला होता. पीएसएलव्ही अग्निबाणानं आजवर 41 वेळा उपग्रहांसह अवकाशात भरारी घेतली होती.  

बिथरला पाकिस्तान
भारताच्या या कामगिरीवर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, भारत ज्या उपग्रहांचं प्रक्षेपण करत आहेत, त्यानुसार दुहेरी धोरणाचा अवलंबत आहे. या उपग्रहांचा वापर नागरी आणि लष्करी उद्दिष्टांच्या दृष्टीनं वापरले जाऊ शकतात. जर असे झाले तर याचे चुकीचे परिणाम होतील.  
 



 



 



 



 



 



 



 



 



 



 

Web Title: Indian Space Research Organisation to launch Cartosat-2 Series satellite on PSLV rocket from Sriharikota in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.