आशियाई स्पर्धेसाठी भारतीय नौकानयन संघ जाहीर

By admin | Published: September 12, 2014 10:38 PM2014-09-12T22:38:50+5:302014-09-12T22:38:50+5:30

नवी दिल्ली: भारतीय नौकानयन महासंघ (आरएफआय) ने 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण कोरियाच्या इंचियोनमध्ये होणार्‍या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 36 सदस्यीय संघाची घोषणा केली आह़े संघामध्ये सुप्रसिद्ध नौका अँथलिटसारखे सवर्ण सिंह आणि बजरंग लाल ताखडसह 22 पुरुष,9 महिला, चार कोच आणि एका फिजियोचा समावेश आह़े संघ हैदराबादहून 14 सप्टेंबरला या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे आणि 27 सप्टेंबरला परतणार आह़े

Indian squadron squad for Asian Games | आशियाई स्पर्धेसाठी भारतीय नौकानयन संघ जाहीर

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय नौकानयन संघ जाहीर

Next
क्षण विस्तार अधिकारीही अडचणीत
नाशिक : शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढ कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना तपासणीत नागापूर (नांदगाव) येथे विद्यार्थी व शिक्षकच ढ आढळल्याने संबंधित केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची वेतनवाढ रोेखण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी शिक्षण विभागाला दिले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी नागापूर येथील शाळेला भेट दिली असता तेथील क श्रेणीतील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरे विचारली असता त्यांना सपशेल अपयश आले. इतकेच नव्हे तर तेथील सात शिक्षकांनाही अपेक्षित उत्तरे देता आली नाही. पोषण आहारासाठीचा तांदूळही शिजवला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मोगल यांनी सात शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे ठेवला. काही दिवसांपूर्वीच शिक्षक संघटनांनी बनकर यांची भेट घेऊन शिक्षकांना एक संधी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सुखदेव बनकर यांनी मग शिक्षकांवर ज्यांनी नियंत्रण ठेवायचे आहे त्या केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकार्‍यांची कायमस्वरूपी एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले. त्यामुळे केंद्रप्रमुख के. एस. खैरनार व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एम. एस. पाटील यांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. यापुढेही कारवाईचे स्वरूप शिक्षकांसह त्यांच्या वरिष्ठांवर राहणार असल्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Indian squadron squad for Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.