मूर्ती लहान, पण...; छोट्या भारतीय विद्यार्थ्याचा छोटासा रोबो स्वच्छ करणार समुद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:20 PM2019-04-12T16:20:39+5:302019-04-12T16:35:38+5:30

भारतीय विद्यार्थ्याची अभिनव कामगिरी

Indian Student In UAE Invents Robots which can Clean Oceans Help Farmers | मूर्ती लहान, पण...; छोट्या भारतीय विद्यार्थ्याचा छोटासा रोबो स्वच्छ करणार समुद्र

मूर्ती लहान, पण...; छोट्या भारतीय विद्यार्थ्याचा छोटासा रोबो स्वच्छ करणार समुद्र

Next

दुबई: सागरी प्रदूषणाची समस्या दिवसागणिक आक्राळविक्राळ रुप धारण करत आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. मात्र नव्या पिढीतील एकानंच यावर उपाय शोधून काढला. अबूधाबीत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यानं सागरी जीवन वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावू शकेल, अशा रोबोटची निर्मिती केली आहे. याशिवाय शेतीसाठी लागणारे श्रम कमी करू शकेल, असा रोबोटदखील या विद्यार्थ्यानं तयार केला. अतिशय उष्ण भागात या रोबोटचा वापर करता येऊ शकतो.

दुबईतील जीईएमएस युनायटेड इंडियन स्कूलमध्ये शिकणाऱ्या साईनाथ मणीकंदननं मरिन बोट क्लिनर (एमबोट क्लिनर) तयार केला आहे. या रोबोटमुळे सागरी प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकेल. 'एमरोबोटमुळे पाण्यावर तरंगणारं प्लास्टिक गोळा करता येईल. एमबोटचा आकार एखाद्या बोटीसारखा आहे. एमबोट रिमोटनं कंट्रोल करता येते. यामध्ये दोन बॅटरी आहेत. त्यांच्या मदतीनं बोट पुढे सरकते,' अशी माहिती मणीकंदननं दिली. 



एमबोटमधील चाकाला काठ्या जोडलेल्या आहेत. या काठ्यांच्या माध्यमातून समुद्रावर तरंगणारा कचरा गोळा करता येईल. त्यानंतर तो बास्केटमध्ये टाकला जाईल, अशा शब्दांमध्ये मणीकंदननं एमबोटची कार्यपद्धती समजावून सांगितली. एमबोटमध्ये सोलार पॅनेलचाही वापर करता येऊ शकतो, असंदेखील तो म्हणाला. यामुळे समुद्र स्वच्छ करण्यास मदत होईल आणि जौवविविधता टिकून राहील, असा विश्वास त्यानं व्यक्त केला. 

Web Title: Indian Student In UAE Invents Robots which can Clean Oceans Help Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.