अमेरिकेत शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी संकटात; ४ ते ६ लाख अधिक मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:46 AM2018-10-11T00:46:21+5:302018-10-11T00:47:06+5:30

वर्षभरापूर्वी प्रतिडॉलर ६५ वर असलेला रुपया आता घसरून ७४ च्या खाली आला आहे. त्याचे गंभीर परिणाम विदेशात विशेषत: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.

 Indian students facing education in America; 4 to 6 lakh more will have to be counted | अमेरिकेत शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी संकटात; ४ ते ६ लाख अधिक मोजावे लागणार

अमेरिकेत शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी संकटात; ४ ते ६ लाख अधिक मोजावे लागणार

Next

नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी प्रतिडॉलर ६५ वर असलेला रुपया आता घसरून ७४ च्या खाली आला आहे. त्याचे गंभीर परिणाम विदेशात विशेषत: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.
मार्च ते एप्रिल अशा शैक्षणिक वर्षासाठी अमेरिकी विद्यापीठांत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये शुल्क भरावे लागते. परंतु नेमकी याच कालावधीत रुपयाची घसरण सुरुच आहे.
या घसरणीमुळे विद्यार्थ्यांना यंदा सुमारे २0 टक्के अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. या हिशोेबाने विद्यार्थ्यांना सुमारे ४ लाख ते ६ लाख रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार आहे, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
पात्रता व प्रवेश परीक्षा, व्हिसा, राहण्याचा खर्च आणि विद्यापीठांची ट्यूशन फी यापोटी विद्यार्थ्यांनी आधीच मोठा खर्च केला आहे. त्यांचा झालेला खर्च सुमारे १५ हजार ते ३0 हजार डॉलरदरम्यान आहे. त्यातच आता रुपया घसरल्यामुळे अतिरिक्त २0 टक्के खर्चवाढ झाली आहे. अगदीच काठावरची आर्थिक तरतूद असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विदेशातील शिक्षणाच्या स्वप्नावर पाणी फेरावे लागणार आहे.
या क्षेत्रातील संशोधनानुसार, सुमारे ५0 टक्के कुटुंबे मुलांना विदेशात शिकविण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. रुपयाच्या घसरणीमुळे या कुटुंबांना १0 लाख रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. बहुतांश कुटुंबांना हा खर्च पेलवणे जवळपास अशक्य आहे.

आॅस्ट्रेलिया, जपानचा पर्याय
सूत्रांच्या मते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला आॅस्ट्रेलिया व जपानचा पर्याय आहे. तेथील खर्च कमी आहे. जर्मनीनेही कमी खर्चाचे शैक्षणिक उपक्रम उपलब्ध करून दिले आहेत.
चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळते. अनेक विद्यापीठे गुणवंतांना मोफत पदव्युत्तर शिक्षण देतात.

Web Title:  Indian students facing education in America; 4 to 6 lakh more will have to be counted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.