भारताच्या हद्दीत घुसणारे पाकिस्तानी ड्रोण सुखोई विमानाने केले उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 10:07 PM2019-03-04T22:07:29+5:302019-03-04T22:08:24+5:30
एकीकडे शांततेच्या बाता मारत असलेल्या पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती सुरूच आहेत.
जयपूर - एकीकडे शांततेच्या बाता मारत असलेल्या पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती सुरूच आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असतानाच आज पाकिस्तानी ड्रोणने राजस्थानच्या सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी दक्ष असलेल्या भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 एमकेआय विमानाने क्षेपणास्त्राद्वारे या ड्रोनच्या चिंधड्या उडवल्या.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास एका पाकिस्तानी ड्रोनने बिकानेर विभागातून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र इंडियन एअर डिफेन्स रडारला या घुसखोरीचा सुगावा लागला. त्यानंतर सज्ज असलेल्या सुखोई 30 एमकेआय विमानाने क्षेपणास्त्र डागून हे ड्रोन उद्ध्वस्त केले.
Rajasthan: At 11:30 am today a Sukhoi 30MKI shot down a Pakistani drone at the Bikaner Nal sector area of the border. Drone was detected by Indian Air Defence radars pic.twitter.com/Ijc4B4XzjN
— ANI (@ANI) March 4, 2019