ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 06:32 PM2020-05-26T18:32:52+5:302020-05-26T18:35:02+5:30
चार तासांहून अधिक काळ ही चर्चा सुरु होती. यामध्ये तिन्ही सेनाप्रमुखांनी सीमेवर सैनिकांची संख्या वाढविण्याचा विचार मांडला.
नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून तणाव वाढविण्याचे काम केले जात आहे. यावर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेनाप्रमुखांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये एलएसीवरील सध्याच्या परिस्थितीची चर्चा केली गेली. तसेच पुढील रणनितीवर विचारविनिमय करण्यात आला.
सुत्रांनी सांगितले की, चार तासांहून अधिक काळ ही चर्चा सुरु होती. यामध्ये तिन्ही सेनाप्रमुखांनी सीमेवर सैनिकांची संख्या वाढविण्याचा विचार मांडला. यावेळी संघर्ष थांबविण्यासाठी चीनसोबत चर्चा सुरुच राहणार आहे. मात्र, भारतीय सैन्यदलही त्याचे काम चोख बजावेल. यामध्ये कोणतीही पडती बाजू घेतली जाणार नाही. या भूभागावर आपली पकड कायम ठेवणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले.
याशिवाय या भागातील रस्ते निर्माणासह अन्य कामे सुरुच राहणार आहेत. तसेच भारत आपल्या जवानांची ताकद वेळोवेळी वाढवत जाणार आहे. यासाठी चीनची जेवढी कुमक असेल तेवढीच कुमक भारताकडून सीमेवर तैनात केली जाणार आहे.
भारताचे सैन्य़ आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत लडाखवरून चर्चा सुरु आहे. तेथील परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी काही बैठकाही झाल्या आहेत. मात्र, यामध्ये यश मिळालेले नाही. रविवारीदेखील मोठ्या अधिकारी स्तरावर बैठक झाली. आता पुढील बैठका क्षेत्रीय कमांडर पातळीवर होण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
प्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर
धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना
राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले
स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला
विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली