"जयपूर फिरायला जाते असं म्हणाली अन्..."; प्रियकरासाठी पाकिस्तानात गेली अंजू, पतीचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:23 AM2023-07-24T10:23:47+5:302023-07-24T10:34:38+5:30
अंजू प्रियकराला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानला गेली. अंजू पती आणि मुलांना सोडून व्हिसा घेऊन पाकिस्तानात पोहोचली आहे.
सीमा हैदरसारखी आणखी एक घटना आता समोर आली आहे. मात्र यामध्ये प्रेयसीने आपल्या प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं आहे. अंजू असं या महिलेचं नाव असून पाकिस्तानात गेलेल्या या महिलेच्या पतीने आता मोठा खुलासा केला आहे. "चार दिवसांपूर्वी तिने मला सांगितले की ती फिरायला जात आहे, मी विचारले असता ती म्हणाली की ती जयपूरला जात आहे, अंजू येथे एका खासगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करते, मी देखील नोकरी करतो" असं अंजूचा पती अरविंदने म्हटलं आहे,
अंजू प्रियकराला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानला गेली. अंजू पती आणि मुलांना सोडून व्हिसा घेऊन पाकिस्तानात पोहोचली आहे. भारतात अंजू राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे तिच्या कुटुंबासह राहत होती. जयपूरला जाण्याच्या बहाण्याने निघून गेलेली पत्नी अंजू आता पाकिस्तानातील लाहोरमध्ये असल्याची माहिती पती अरविंदला रविवारी मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून अंजूची चौकशी सुरू केली तेव्हा त्याला धक्काच बसला.
अरविंदने सांगितले, अंजू चार दिवसांपूर्वी फिरायला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. काही दिवसात परत येईल. अरविंदच्या म्हणण्यानुसार, अंजू Whatsapp कॉलिंगद्वारे सतत त्याच्या संपर्कात असते. रविवारीही तिने माझ्याशी Whatsapp कॉलिंगद्वारे संवाद साधला. मग तिने मला सांगितले की ती लाहोर, पाकिस्तानमध्ये आहे आणि 2-3 दिवसात परत येईल. अरविंद म्हणाले, पत्नी अंजू ही भिवडीतील एका खासगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करते. मी पण खासगी नोकरी करतो. पतीने सांगितले की, तो 2005 पासून भिवडी येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. त्याला २ मुले आहेत.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे पती आणि मुलांसह राहणारी अंजू ही मूळची यूपीच्या कालोर येथील आहे. तिचा प्रियकर नसरुल्लाह पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे राहतो आणि तो मेडिकल रिप्रेजेन्टेटिव्ह आहे. अरविंद पुढे म्हणाला, अंजूच्या कोणत्याही प्रियकराबद्दल मला कोणतीही माहिती नाही. तिने मला दोन-तीन दिवसांत भारतात परत येईन असं सांगितलं आहे. मला आशा आहे की ती भारतात येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.