स्विस बँकेत भारतीयांचे ८,३९२ कोटी
By admin | Published: June 19, 2017 01:20 AM2017-06-19T01:20:28+5:302017-06-19T01:20:28+5:30
सिंगापूर, हॉंगकॉंग व जगातील अन्य प्रमुख आर्थिक केंद्रांच्या तुलनेत स्विस बँकांमध्ये असलेले भारतीयांचे पैसे अगदीच कमी आहेत. स्विस बँकांमधील भारतीयांच्या निधीने सन २०१५
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सिंगापूर, हॉंगकॉंग व जगातील अन्य प्रमुख आर्थिक केंद्रांच्या तुलनेत स्विस बँकांमध्ये असलेले भारतीयांचे पैसे अगदीच कमी आहेत. स्विस बँकांमधील भारतीयांच्या निधीने सन २०१५ अखेरीस १.२ अब्ज स्विस फ्रँक्स (सुमारे ८,३९२ कोटी रुपये) एवढा निचांक गाठला होता. काळ्या पैशांविरुद्ध कडक पाउले उचलली जात असताना स्वीत्झर्लंडच्या खासगी बँकांच्या एका समूहाने ही माहिती दिली आहे.
या आकडेवारीतून अन्य जागतिक आर्थिक केंद्रातील माहिती मात्र मिळू शकली नाही. भारत आणि अन्य ४० देशांना याबाबतची माहिती पुरविण्याचा एक निर्णय स्वीत्झर्लंडने गत आठवड्यात घेतला आहे. माहितीच्या स्वयंचलित देवाणघेवाणीसाठी असलेली चौकट म्हणजे डेटाची गुप्तता पाळणे आवश्यक आहे. याबाबत जिनेव्हा येथील असोसिएशन आॅफ स्वीस प्राइव्हेट बँकेने म्हटले आहे की, भारताच्या बाबत आम्हाला वेगळी काळजी वाटत नाही. कारण, येथे कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. असोसिएशनचे व्यवस्थापक जान लांगलो यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सिंगापूर आणि हाँगकाँगच्या तुलनेत भारतीयांचे स्वीत्झर्लंडमध्ये कमी खाते आहेत. भारतीयांच्या प्रवृत्तीबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशी कोणतीही खास प्रवृत्ती नाही.