स्विस बँकांमधला भारतीयांचा पैसा १० टक्क्यांनी घटला

By admin | Published: June 18, 2015 04:53 PM2015-06-18T16:53:54+5:302015-06-18T18:09:02+5:30

स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक (१२,६१५ कोटी रुपये) इतकी झाली आहे.

Indians' money in Swiss banks dropped by 10 percent | स्विस बँकांमधला भारतीयांचा पैसा १० टक्क्यांनी घटला

स्विस बँकांमधला भारतीयांचा पैसा १० टक्क्यांनी घटला

Next

ऑनलाइन लोकमत

झुरीच (स्वित्झर्लंड), दि. १८ - स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक (१२,६१५ कोटी रुपये) इतकी झाली आहे. भारत सरकारसह अन्य काही देशांनी स्विस बँकांमध्ये दडवण्यात येणा-या काळ्या पैशाबाबत आक्रमक भूमिका घेत केलेल्या विरोधाला फळ येताना दिसत आहे. विशेष म्हणजे जगभरातून स्विस बँकेत येणारा पैशाचा ओघ वाढला असताना भारतीयांची पुंजी मात्र घटली आहे. स्विस बँकांमध्ये जगभरातल्या गुंकवणूकदारांनी ठेवलेली रक्कम या वर्षी ९० लाख कोटी रुपयांवरून वाढून १०३ लाख कोटी किंवा १.६० लाख कोटी डॉलर्स एवढी झाली आहे.
ताज्या माहितीनुसार, २०१४च्या अखेरीस भारतीयांनी स्विस बँकेत ठेवलेली एकूण रक्कम १७७६ दशलक्ष स्विस फ्रँक होती, जी एका वर्षापूर्वी १९५२ दशलक्ष स्विस फ्रँक होती. तर भारतीयांचा पैसा स्विस बँकेत ठेवणा-या अन्य वित्तसंस्थांची ठेवही या कालावधीत ७७.३ दशलक्ष स्विस फ्रँकवरून घसरून ३८ दशलक्ष स्विस फ्रँक एवढी झाल्याचे स्विस सेंट्रल बँकेने जाहीर केले आहे.

 

Web Title: Indians' money in Swiss banks dropped by 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.