परिस्थिती निवळेपर्यंत भारतीयांनी तुर्कस्तानात जाणे टाळावे - सुषमा स्वराज

By admin | Published: July 16, 2016 10:50 AM2016-07-16T10:50:48+5:302016-07-16T10:52:54+5:30

तुर्कस्तानमधील परिस्थिती निवळेपर्यंत भारतीयांनी तेथे जाणे टाळावे व तेथे अडकलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सुषमा स्वराज यांनी केले.

Indians should avoid leaving to Turkey until the situation is resolved - Sushma Swaraj | परिस्थिती निवळेपर्यंत भारतीयांनी तुर्कस्तानात जाणे टाळावे - सुषमा स्वराज

परिस्थिती निवळेपर्यंत भारतीयांनी तुर्कस्तानात जाणे टाळावे - सुषमा स्वराज

Next
ऑनलाइन लोकमत
अंकारा, दि. १६ - तुर्कस्तानच्या लष्कराने सरकारविरोधात केलेल्या उठावात ४२ जण झाले असून ३०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संघर्षपूर्ण वातावरणात तेथील स्थानिकांसह काही भारतीयही अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने  भारतीय नागरिकांना तेथील परिस्थिती शांत होईपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच तुर्कस्तानातील परिस्थिती पूर्णपणे निवळेपर्यंत भारतीयांनी तुर्कस्तानला जाणे टाळावे, असेही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. स्वराज यांनी ट्विटरवरून या प्रकरणी सर्व माहिती दिली असून तुर्कस्तानातील भारतीय दूतावासाचा नंबरही शेअर केला आहे. 
 
(तुर्कस्तान : लष्कराचा सत्तापालट करण्याचा डाव उधळला, ४२ ठार) 
 
लष्करातील एका गटाने शुक्रवारी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला, बंडखोरांनी हेलिकॉप्टरमधून केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत ४२ जण ठार झाले आहेत. या कारवाईनंतर भारताचे परराष्ट्र खाते सतर्क झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी अंकारामधील भारतीय राजदूतात राहणाऱ्या भारतीयांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच  भारतीय नागरिकासांठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून तो  +905303142203 असा आहे. तर इस्तांबुल मधील नागरिकासाठी  +905305671095 हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. 

Web Title: Indians should avoid leaving to Turkey until the situation is resolved - Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.