लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:04 PM2024-10-01T13:04:59+5:302024-10-01T13:06:47+5:30

इस्रायलने आता लेबनॉनमध्ये जमिनीवर लष्करी कारवाई सुरू केली आहे.

Indians stuck in Lebanon? Concerns increased after Israel's action, PM narendra Modi called Netanyahu | लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन

लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन

गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हिजबुल्लाह मध्ये तणाव वाढला आहे. पेजर हल्ले, हवाई हल्ले करून इस्रायलने लेबनॉनमध्ये हाहाकार उडवून दिलेला असताना मंगळवारी रात्री लेबनॉनच्या हद्दीमध्ये सैन्य घुसविले आहे. इस्रायली सैन्याचे हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये रणागाडे, रॉकेट लाँचर घेऊन घुसले आहेत. आयडीएफने मंगळवारी पहाटे याची माहिती जगाला दिली आहे. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.   

इस्त्रायलच्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडाली असून अनेक देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. या युद्धामुळे भारतानेही आपल्या नागरिकांना लेबनॉनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.

इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य

लेबनॉनमध्ये ४००० हून अधिक नागरिक

मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉनमध्ये ४००० हून अधिक भारतीय आहेत आणि केंद्र सरकारने सर्वांना लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. बेरूतमधील लेबनॉनमध्ये राहणारे भारतीय नागरिक बांधकाम क्षेत्र, कृषी फार्म इत्यादींमध्ये काम करतात.

भारतीय दुतावासाने याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, १९७५ ते १९९० च्या गृहयुद्धादरम्यान भारताने इतर देशांच्या दूतावासांप्रमाणे बेरूतमधील आपला दूतावास खुला ठेवला आणि कार्यरत राहिला. लेबनीज जनतेने, तसेच भारताचे अरब जगाशी असलेले पारंपारिकपणे मजबूत संबंध आणि पॅलेस्टाईनसाठी आमचे दृढ समर्थन याचे खूप कौतुक आहे, असंही ते म्हणाले. 

भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना युद्धाच्या काळात या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. सरकारने लेबनॉनमधील सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

"लेबनॉनमध्ये आधीपासूनच उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आवाहन केले आहे" असे दूतावासाने म्हटले आहे. जे लोक कोणत्याही कारणास्तव तेथे राहतात त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही अडचण आल्यास त्यांनी ईमेल आयडी: cons.beirut@mea.gov.in किंवा आपत्कालीन फोन नंबर +96176860128 द्वारे बेरूतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली


ग्राउंड स्ट्राइक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाचा नायनाट कसा करणे आवश्यक आहे यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

Web Title: Indians stuck in Lebanon? Concerns increased after Israel's action, PM narendra Modi called Netanyahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.