ट्रम्प यांचा भारतीयांना दणका, H1B Visa मध्ये केला बदल
By admin | Published: April 19, 2017 10:27 PM2017-04-19T22:27:21+5:302017-04-19T22:27:21+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंगटन, दि. 19 -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली. याचा भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. या व्हिसाचा गैरवापर रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च कुशल आणि सर्वाधिक वेतनधारी विदेशी व्यावसायिकांनाच हा व्हिसा मिळावा, असे ट्रम्प यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘बाय अमेरिका, हायर अमेरिका’ या धोरणानुसार ट्रम्प यांनी आपला आदेश काढला आहे. या आदेशाचा भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. विस्कोन्सिनमधील केनोशा येथे स्नॅप आॅन इंक कंपनीच्या मुख्यालयात ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. हा अध्यादेश लागू झाल्याने आता अमेरिकेत आयटी कंपन्यांना नोकरी देताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य द्यावे लागणार आहे. तत्पूर्वी त्यांनी तेथे एका सभेला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, सध्या लॉटरी पद्धतीने एच-१बी व्हिसा दिले जात आहेत. हे चूक आहे. त्याऐवजी सर्वाधिक कुशल आणि वेतनधारी लोकांना हे व्हिसा दिले जायला हवेत. अमेरिकी नागरिकांना नोकऱ्या नाकारण्यासाठी व्हिसाचा गैरवापर होता कामा नये.
अमेरिकेतील प्रकल्प अमेरिकेतील माल वापरूनच पूर्ण करण्याचे बंधन या आदेशात घालण्यात आले आहे. अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनचे संचालक बेस्टी लॉरेन्स यांनी सांगितले की, या आदेशाचा एच-१बी व्हिसावर लगेच परिणाम होणार