अफगाणिस्तानला भारताची मोठी मदत, पाकिस्तानमार्गे 50 हजार मीट्रिक टन धान्याची निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:45 PM2022-02-22T17:45:05+5:302022-02-22T18:10:56+5:30

काही दिवसांपूर्वी भारताने अफगाणिस्तानला सुमारे 2.5 टन वैद्यकीय साहित्य आणि कपडे पाठवले होते.

India's aid to Afghanistan, India to send 50,000 MT of wheat to Afghanistan | अफगाणिस्तानला भारताची मोठी मदत, पाकिस्तानमार्गे 50 हजार मीट्रिक टन धान्याची निर्यात

अफगाणिस्तानला भारताची मोठी मदत, पाकिस्तानमार्गे 50 हजार मीट्रिक टन धान्याची निर्यात

googlenewsNext

नवी दिल्ली : महागाई, गरिबी आणि अन्न संकटाने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानलाभारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आज पाकिस्तानमार्गे 50 हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या हस्ते अन्नधान्याच्या या खेपेला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. भारताच्या या मानवतावादी उपक्रमामुळे अफगाणिस्तानमधील नागरिक खूप खूश आहेत. 

पाकिस्तानसोबतच्या चर्चेच्या आधारे गव्हाची ही खेप अटारी-वाघा बॉर्डरमार्गे अफगाणिस्तानात पोहोचेल. या संदर्भात, भारताने 7 ऑक्टोबर 2021 रोजी इस्लामाबादला एक प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये 50 हजार मेट्रिक टन गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवण्याची विनंती केली होती. त्याचवेळी 24 नोव्हेंबरला पाकिस्तानकडून मिळालेल्या प्रत्युत्तरानंतर दोन्ही देश वाहतुकीशी संबंधित योजना ठरवली.

याच्या काही दिवसांपूर्वी भारताने अफगाणिस्तानला सुमारे 2.5 टन वैद्यकीय साहित्य आणि कपडे पाठवले होते. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानात राहणार्‍या शीख-हिंदू शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांना भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या समस्या आणि समस्यांचे निराकरण केले जाईल असे सांगितले.

तसेच, गेल्या महिन्यात भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अफगाणिस्तानच्या लोकांना मानवतावादी आधारावर मदत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत सरकार मानवतावादी आधारावर अफगाणिस्तानच्या नागरिकांना अन्नधान्य, कोविड लस आणि इतर जीवरक्षक औषधे देण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या काही आठवड्यात कोविड लसीचे 5 लाख डोस आणि वैद्यकीय पुरवठा अफगाणिस्तानला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: India's aid to Afghanistan, India to send 50,000 MT of wheat to Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.