मद्यसम्राटाची भारतवापसी?

By admin | Published: April 19, 2017 03:29 AM2017-04-19T03:29:12+5:302017-04-19T03:29:12+5:30

आकाशपाताळ एक करून मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार करीत असलेले प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे दिसत असून

India's alcoholic beverage? | मद्यसम्राटाची भारतवापसी?

मद्यसम्राटाची भारतवापसी?

Next

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
आकाशपाताळ एक करून मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार करीत असलेले प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे दिसत असून, आता न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माल्या भारताच्या हाती येईल. ब्रिटनच्या स्कॉटलँड पोलिसांनी माल्याला अटक करताना, त्याच्या प्रत्यार्पणाची कार्यवाहीही सुरू केली आहे. अटकेनंतर वेस्टमिन्स्टर कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली असली, तरी भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले आहेत.
माल्याचे प्रकरण मोदी सरकारची कसोटी पाहाणारे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांची संसदेच्या स्वागतकक्षात भेट घेतल्यानंतर माल्याने २ मार्च २०१६ च्या रात्री कोणालाही थांगपत्ता न लागू देता भारतातून पळ काढून लंडन गाठले. थकीत कर्जापैकी ४ हजार कोटी रुपये परत करण्याची तयारी दाखवित, त्याने वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना राजी करावे, यासाठी सरकारला मदत करण्याचे साकडेही घातले. त्यावर जेटली यांनी तुम्हीच स्वत: बँकांशी बोलणी करून वाद तात्काळ मिटवा, असे माल्याला सांगितले होते. तो भारत सोडून गेल्याचे कळताच मोदी सरकारची पंचाईत झाली होती. त्यानंतर सरकारने ब्रिटिश उच्चायुक्तांना पाचारण करून माल्याच्या प्रर्त्यापणासाठी ब्रिटनला मदत करण्याची विनंती केली.
फेमा प्रकरण प्रलंबित असताना आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदी हाही ब्रिटनला पळून गेला. अशात माल्याने पळ काढल्याने मोदी सरकारच्या प्रतिमेला चांगलाच हादरा बसला. ललित मोदींच्या कॅन्सरग्रस्त पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रिटनला नेण्यासाठी संबंधित कागदपत्रे मिळवून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने मोदी सरकार आणखीच कोंडीत सापडले होते. त्यापाठोपाठ मोईन कुरेशीचे प्रकरण उजेडात आले; परंतु माल्यामुळे मोदी सरकार भलतेच अडचणीत सापडले.
अखेर जेटली यांनी लंडनला भेट देऊ न आर्थिक घोटाळा करणाऱ्यासाठी लंडन सुरक्षित ठिकाण होऊ शकत नाही, असे स्पष्ट करून ब्रिटिश सरकारला माल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य पटवून दिले. मोदी यांनीही राजनैतिक मार्गाने माल्या प्रकरण भारताच्या दृष्टीने किती गंभीर आणि महत्त्वाचे असल्याचे कळविले होते.
मोईन कुरेशीला भारतात आणून त्याच्याविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात मोदी सरकारला यश आले. तसेच शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारीलाही भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत:ला ‘द किंग आॅफ गुड टाइम्स’ म्हणणारा विजय माल्याला अखेर दणका बसलाच. त्याची किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये वाढत्या कर्जामुळे बंद पडली. कर्जप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून, माल्याला या प्रकरणातही चौकशीला सामोरे जावे लागेल.

Web Title: India's alcoholic beverage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.