पंतप्रधान मोदींनी अमेरिकन सदस्यांच्या कानावर घातली भारताची नाराजी
By admin | Published: February 22, 2017 08:09 AM2017-02-22T08:09:15+5:302017-02-22T08:09:15+5:30
अमेरिकेत राहणारे भारतीय तज्ञ अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहेत. कायद्याचे पालन करुन तिथल्या सामाजिक व्यवस्थेशी एकरुप झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - H-1B व्हिसावर नियंत्रण आणण्याच्या धोरणाचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने फेरविचार करावा. प्रतिभावंतांवर अशा प्रकारे निर्बंध आणणे योग्य नाही असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांबरोबर झालेल्या चर्चे दरम्यान व्यक्त केले. या चर्चेतून त्यांनी अमेरिकेच्या H-1B व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थतता ट्रम्प प्रशासनाच्या कानावर घातली.
अमेरिकेत रोजगार निर्मितीचा आकडा वाढावा यासाठी ट्रम्प यांनी राष्ट्रध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात H-1B व्हिसावर नियंत्रण आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याच आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम ट्रम्प यांनी सुरु केले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये नाराजी आहे.
अमेरिकेत राहणारे भारतीय तज्ञ अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहेत. कायद्याचे पालन करुन तिथल्या सामाजिक व्यवस्थेशी एकरुप झाले आहेत तसेच फक्त H-1B व्हिसाधारकालाच फायदा होत नाही तर, अमेरिकेलाही त्याचा फायदा होते असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत आणि अमेरिका आणखी जवळ येऊन एकत्रितपणे कोणत्या क्षेत्रात काम करु शकतात त्यावर मोदींनी आपली मते मांडली.