कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ, भारताची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 03:17 PM2023-06-08T15:17:36+5:302023-06-08T15:18:29+5:30
Indira Gandhi: कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत.
कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहेत. मला वाटतं की, यामध्ये एका मोठा मुद्दा समाविष्ट आहे, स्पष्टपणे सांगायचं तर व्होटबँकेच्या राजकारणाशिवाय असं कोण कशाला करेल, असा प्रश्न जयशंकर यांनी उपस्थित केला आहे.
परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, मला वाटतं की, हा एक मोठा अंतर्निहित मुद्दा आहे. त्या स्थानाबाबत जे फुटिरतावादी, कट्टरतावादी, हिंसाचाराचं समर्थन करणारे यांना दिलं जातं. मला वाटतं की,हे दोन देशांच्या संबंधांसाठी चांगलं नाही आहे. तसेच कॅनडासाठीही चांगलं नाही आहे.
यादरम्यान, काँग्रेसने कॅनडामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवत काढलेल्या कथित चित्ररथाच्या घटनेचा निषेध करत भारत सरकारने हा मुद्दा कॅनडासमोर सक्षमपणे मांडावा, अशी मागणी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून एस. जयशंकर यांच्याकडे ही मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील बेम्पटन येथे खलिस्तान समर्थकांनी हल्लीच इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंग दाखवणारा चित्ररथ फिरवला होता. त्याचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्निट केलं की, कॅनडाच्या ब्रेम्पटन येथे पाच किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली, ज्यात इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ दाखवण्यात आला, हे पाहून एक भारतीय म्हणून मला वेदना झाल्या. हा कुणाची बाजू घेणयाचा विषय नाही आहे. तर राष्ट्राचा इतिहास आणि माजी पंतप्रधानांच्या हत्येमुळे झालेल्या वेदनेच्या सन्मानाची बाब आहे.
देवरा पुढे म्हणाले की, कट्टरतावादाचा सार्वत्रिकपणे निषेध केला गेला पाहिजे. तसेच त्याचा मिळून सामना केला पाहिजे. देवरा यांचं हे ट्विट रीट्विट करत जयराम रमेश यांनी या विधानाशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे सांगितले. तसेच कॅनडासमोर हा मुद्दा सक्षमपणे मांडला जावा, अशी मी जयशंकर यांच्याकडे मागणी करतो, असेही रमेश म्हणाले.