पाकिस्तानच्या नापाक गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर
By admin | Published: April 5, 2017 10:10 AM2017-04-05T10:10:33+5:302017-04-05T10:10:33+5:30
जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 5 - जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पूँछच्या दिगवार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि मोर्टर शेलचा मारा केला. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या नापाक हरकतीला चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु आहे.
भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पाकिस्तानने या सेक्टरमध्ये दुस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 48 तासात पाकिस्तानने चौथ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मंगळवारी राजौरी जिल्ह्यात भीमबेर गालीमध्ये पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता.
राजौरी-पूँछ जिल्ह्यात 24 तासात पाकिस्तानने तिस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. कालही पाकिस्तानी सैन्याने बालाकोटे सेक्टरमध्ये गोळीबार आणि मोर्टर शेल्सचा मारा केला होता. दीगवार भागात मोठया प्रमाणात झालेल्या मॉटर्र शेल्सच्या मा-यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याच भागात 1 एप्रिलला आईडीच्या स्फोटात एका जेसीओचा मृत्यू झाला होता. मार्च महिन्यात पूँछमध्ये पाकिस्तानने चारवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 2016 मध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ 228 वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ 221 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.