भारतावर हल्ल्याचा सईदचा पुन्हा कट?

By Admin | Published: December 29, 2016 12:07 AM2016-12-29T00:07:58+5:302016-12-29T00:07:58+5:30

लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे.

India's attack Saeed again? | भारतावर हल्ल्याचा सईदचा पुन्हा कट?

भारतावर हल्ल्याचा सईदचा पुन्हा कट?

googlenewsNext

इस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. यासाठी त्याने इस्लामिक स्टेट (इसिस)ची मदत मागितली असल्याचे वृत्त आहे. इस्लामिक स्टेटला आपल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हाफिज सईदची लष्कर-ए-तय्यबा तसेच फलाह-ए-इन्सानियत या दोन्ही संघटना सीरियामध्ये सक्रिय झाल्या आहेत.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदची संघटना फलाह-ए-इन्सानियत तेथील लोकांना मदत पुरवण्याचे काम करत आहे. पण मदतीच्या नावाखाली हाफिज सईद प्रत्यक्षात सीरियीमधील इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
फलाह-ए-इन्सानियत संघटनेच्या नावाखाली हाफिज सईद लष्कर-ए-तयब्बाचे दहशतवादी नेटवर्क चालवतो, हे उघड झाले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज इस्लामिक स्टेटच्या मदतीने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. याशिवाय हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला भारताशी मैत्री न करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय जवान काश्मीरमधील लोकांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप हाफिज सतत करीत आला आहे. या आरोपांद्वारे तो पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची सहानुभूती व आर्थिक मदत मिळवत असतो. काश्मीरमधील लोकांना मदत केली पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, अशी मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली आहे.
या वर्षीच्या जानेवारी महिन्यात फलाह-ए-इन्सानियत
फाउंडेशनवर बंदी घालण्याची तयारी सरकारने
सुरू केली होती. तसेच त्याच्याच जमात उल दवा या संघटनेवरही सरकारने बंदी घालण्याचे ठरवले होते. पण अद्याप या सर्व संघटना पाकिस्तानात, विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनतर्फे अनेक ठिकाणी मोफत दवाखानेही चालविले जातात. (वृत्तसंस्था)

फलाह-ए-इन्सानियतविषयी
फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन ही संस्था गरीब लोकांना अन्नधान्य तसेच अन्य मदत करण्यासाठी हाफिज सईदने स्थापन केली असली तरी त्या मार्गाने लष्कर-ए-तयब्बासाठी अतिरेकी तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनने रक्तदान शिबिरे, वैद्यकीय तपासणी शिबिरे अशी कामे करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांची सहानुभूती मिळवली आहे.
मात्र या संस्थेच्या कामांचा अंतिम उद्देश अतिरेकी कायवाया आहे, हे पाकिस्तान सरकारलाही माहीत आहे.

Web Title: India's attack Saeed again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.