भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 05:10 AM2020-04-13T05:10:05+5:302020-04-13T05:10:18+5:30

आयसीएमआर; ७८ जिल्ह्यांत साथीचा फैलाव

India's avoidance of Italy was prevented by lockdown, ICMR says | भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक

भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे इटलीमध्ये जशी भयानक स्थिती निर्माण झाली ती वेळ केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे भारतावर ओढविली नाही, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिक ल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे. भारतातील कोरोना साथीच्या स्थितीचा या संस्थेने आढावा घेतला आहे. त्यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे की, कोरोनाबाबत भारताला इटली होण्यापासून लॉकडाऊनने वाचविले आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्याआठ हजारांहून अधिक झाली आहे. त्यातील सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. देशातील फक्त ७८ जिल्ह्यांपुरता या साथीचा फैलाव मर्यादित राहिला आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याचे अतिरिक्त सचिव विकास स्वरूप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला नसता तर कोरोनाचा भारतात प्रचंड प्रमाणात संसर्ग होऊन इटलीत निर्माण झाली तशी परिस्थिती उद््भवली असती. मात्र केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंग आवश्यक
आयसीएमआरने म्हटले आहे की, लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंग नसेल तर एका कोरोना रुग्णामुळे महिनाभरात सुमारे ४०६ लोकांना या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे साथीचा झपाट्याने प्रसार होऊन अनेक जणांनी जीव गमावला असता. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगच्या बंधनामुळे आता एका कोरोना रुग्णाकडून फक्त दोन किंवा तीन लोकांनाच संसर्ग होण्याची शक्यता उरली आहे.

देश एकूण रुग्ण मृत्यू बरे झाले उपचार सुरू
इटली 1,52,271 19,468 32,534 1,00,269
भारत 9,166 325 1,061 7,780

Web Title: India's avoidance of Italy was prevented by lockdown, ICMR says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.