'भारताने आपली चूक सुधारावी'; पबजीसह ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:09 PM2020-09-03T16:09:21+5:302020-09-03T16:12:13+5:30

केंद्र सरकारने बुधवारी चीनला आणखी एक दणका देत पबजीसह आणखी ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

India's ban on mobile apps violates the legal interests of Chinese investors and service providers | 'भारताने आपली चूक सुधारावी'; पबजीसह ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

'भारताने आपली चूक सुधारावी'; पबजीसह ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

Next

नवी दिल्ली: केंद्र सरकारने बुधवारी चीनला आणखी एक दणका देत पबजीसह आणखी ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. मात्र भारताच्या या कारवाईचा चीनकडून विरोध करण्यात आला आहे.

पबजीसह ११८ चिनी अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातल्यानंतर यावर पहिल्यांदाच चीनने प्रतिक्रिया दिली आहे. मोबाइल अ‍ॅप्सवर भारताने घातलेली बंदी चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हितांचं उल्लंघन आहे, असं चीनने सांगितले आहे. तसेच चीन या मुद्द्यावर गंभीर असून भारताने आपली चूक सुधारावी, असं वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते जी. फेंग यांनी म्हटले आहे.

पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. 'या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ६९ ए च्या अंतर्गत पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या अ‍ॅप्सबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरील अनेक अ‍ॅप्सबद्दल सरकारकडे तक्रारी आल्या होत्या, असंही मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.

याआधी मोदी सरकारनं टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जूनच्या अखेरीस टिकटॉक, हेलोसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पबजीसह लिविक, वीचॅट वर्क, वीचॅट रिडिंग, अ‍ॅपलॉक, कॅरम फ्रेंड्स यासारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. 

गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांत त्या तणावात आणखी भर पडली आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. पँगाँग सरोवराजवळ हा प्रकार घडला. यानंतर ३१ ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकदा चिनी सैन्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही भारतीय जवानांनी चिनी सैन्याला रोखलं. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने बंदी घातलेले ११८ चिनी अ‍ॅप्स नेमके कोणते आहे जाणून घ्या-

  • APUS Launcher Pro- Theme, Live Wallpapers, Smart
  • APUS Launcher -Theme, Call Show, Wallpaper, HideApps
  • APUS Security -Antivirus, Phone security, Cleaner
  • APUS Turbo Cleaner 2020- Junk Cleaner, Anti-Virus
  • APUS Flashlight-Free & Bright
  • Cut Cut – Cut Out & Photo Background Editor
  • Baidu
  • Baidu Express Edition
  • FaceU - Inspire your Beauty
  • ShareSave by Xiaomi: Latest gadgets, amazing deals
  • CamCard - Business Card Reader
  • CamCard Business
  • CamCard for Salesforce
  • CamOCR
  • InNote
  • VooV Meeting - Tencent Video Conferencing
  • Super Clean - Master of Cleaner, Phone Booster
  • WeChat reading
  • Government WeChat
  • Small Q brush
  • Tencent Weiyun
  • Pitu
  • WeChat Work
  • Cyber Hunter
  • Cyber Hunter Lite
  • Knives Out-No rules, just fight!
  • Super Mecha Champions
  • LifeAfter
  • Dawn of Isles
  • Ludo World-Ludo Superstar
  • Chess Rush
  • PUBG MOBILE Nordic Map: Livik
  • PUBG MOBILE LITE
  • Rise of Kingdoms: Lost Crusade
  • Art of Conquest: Dark Horizon
  • Dank Tanks
  • Warpath
  • Game of Sultans
  • Gallery Vault - Hide Pictures And Videos
  • Smart AppLock (App Protect)
  • Message Lock (SMS Lock)-Gallery Vault Developer Team
  • Hide App-Hide Application Icon
  • AppLock
  • AppLock Lite
  • Dual Space - Multiple Accounts & App Cloner
  • ZAKZAK Pro - Live chat & video chat online
  • ZAKZAK LIVE: live-streaming & video chat app
  • Music - Mp3 Player
  • Music Player - Audio Player & 10 Bands Equalizer
  • HD Camera Selfie Beauty Camera
  • Cleaner - Phone Booster
  • Web Browser & Fast Explorer
  • Video Player All Format for Android
  • Photo Gallery HD & Editor
  • Photo Gallery & Album
  • Music Player - Bass Booster - Free Download
  • HD Camera - Beauty Cam with Filters & Panorama
  • HD Camera Pro & Selfie Camera
  • Music Player - MP3 Player & 10 Bands Equalizer
  • Gallery HD
  • Web Browser - Fast, Privacy & Light Web Explorer
  • Web Browser - Secure Explorer
  • Music player - Audio Player
  • Video Player - All Format HD Video Player
  • Lamour Love All Over The World
  • Amour- video chat & call all over the world.
  • MV Master - Make Your Status Video & Community
  • MV Master - Best Video Maker & Photo Video Editor
  • APUS Message Center-Intelligent management
  • LivU Meet new people & Video chat with strangers
  • Carrom Friends : Carrom Board & Pool Game-
  • Ludo All Star- Play Online Ludo Game & Board Games
  • Bike Racing : Moto Traffic Rider Bike Racing Games
  • Rangers Of Oblivion : Online Action MMO RPG Game
  • Z Camera - Photo Editor, Beauty Selfie, Collage
  • GO SMS Pro - Messenger, Free Themes, Emoji
  • U-Dictionary: Oxford Dictionary Free Now Translate
  • Ulike - Define your selfie in trendy style
  • Tantan - Date For Real
  • MICO Chat: New Friends Banaen aur Live Chat karen
  • Kitty Live - Live Streaming & Video Live Chat
  • Malay Social Dating App to Date & Meet Singles
  • Alipay
  • AlipayHK
  • Mobile Taobao
  • Youku
  • Road of Kings- Endless Glory
  • Sina News
  • Netease News
  • Penguin FM
  • Murderous Pursuits
  • Tencent Watchlist (Tencent Technology
  • Learn Chinese AI-Super Chinese
  • HUYA LIVE – Game Live Stream
  • Little Q Album
  • Fighting Landlords - Free and happy Fighting Landlords
  • Hi Meitu
  • Mobile Legends: Pocket
  • VPN for TikTok
  • VPN for TikTok
  • Penguin E-sports Live assistant
  • Buy Cars-offer everything you need, special offers and low prices
  • iPick
  • Beauty Camera Plus - Sweet Camera & Face Selfie
  • Parallel Space Lite - Dual App
  • "Chief Almighty: First Thunder BC
  • MARVEL Super War NetEase Games
  • AFK Arena
  • Creative Destruction NetEase Games
  • Crusaders of Light NetEase Games
  • Mafia City Yotta Games
  • Onmyoji NetEase Games
  • Ride Out Heroes NetEase Games
  • Yimeng Jianghu-Chu Liuxiang has been fully upgraded
  • Legend: Rising Empire NetEase Games
  • Arena of Valor: 5v5 Arena Games
  • Soul Hunters
  • Rules of Survival

Web Title: India's ban on mobile apps violates the legal interests of Chinese investors and service providers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.