एफडीआयसाठी भारत BEST डेस्टिनेशन,चीनला टाकलं मागे
By admin | Published: April 22, 2016 01:31 PM2016-04-22T13:31:53+5:302016-04-22T13:57:13+5:30
परकीय गुंतवणूक खेचून आणण्याच्या स्पर्धेत भारताने चीनला मागे टाकले आहे. २०१५ मध्ये भारतात विविध क्षेत्रातील ६३ अब्ज डॉलर्सच्या एफडीआय गुंतवणूकीच्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - परकीय गुंतवणूक खेचून आणण्याच्या स्पर्धेत भारताने चीनला मागे टाकले आहे. २०१५ मध्ये भारतात विविध क्षेत्रातील ६३ अब्ज डॉलर्सच्या एफडीआय गुंतवणूकीच्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे. एफडीआय प्रकल्पांची संख्या आठ टक्क्यांनी वाढून ६९७ झाली आहे.
फॉक्सकॉन आणि सन एडीसन या कंपन्यांनी भारतामध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. फॉक्सकॉन भारतामध्ये ५ अब्ज डॉलर्स आणि सन एडीसन ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आणि अपारंपारिक ऊर्जा या क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणावर एफडीआय येणार आहे.
२०१५ मध्ये संपूर्ण जगामध्ये भारताने पहिल्यांदा एफडीआय गुंतवणूकीत आघाडी घेतली होती. भारताने त्यावेळी अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त एफडीआय गुंतवणूक खेचून आणली होती.
एफडीआय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये भारत सर्वात पुढे आहे असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंतसिन्हा यांनी टि्वट करुन सांगितले. २०१५ मधील एफडीआय गुंतवणूकीच्या दहा सर्वोत्तम ठिकाणांमध्ये पाच ठिकाणे भारतातील आहेत. गुजरात अव्वल स्थानावर असून, परकीय गुंतवणूकदारांनी गुजरातमध्ये १२.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्राची कामगिरीही सर्वोत्तम असून, महाराष्ट्रामध्ये ८.३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची तयारी दाखवली आहे.
India Emerges on Top in Attracting FDIhttps://t.co/Dzw8NxPJF6#TransformingIndia
— Jayant Sinha (@jayantsinha) April 21, 2016
via NMApp pic.twitter.com/f8QNqJ8JvD