राजस्थानात भारतातला सर्वात मोठा सुसाइड पॉइंट
By admin | Published: May 4, 2016 06:54 PM2016-05-04T18:54:42+5:302016-05-04T18:54:42+5:30
राजस्थानातल्या कोटा इथं भारतातला सर्वात खतरनाक आणि मोठा सुसाइड पॉइंट असल्याची माहिती आता समोर येते आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4- आतापर्यंत मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी-लिंक सुसाइंट पॉइंट म्हणून लोकांना परिचित होतं. मात्र राजस्थानातल्या कोटा इथं भारतातला सर्वात खतरनाक आणि मोठा सुसाइड पॉइंट असल्याची माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे कोटा हे शहर आता सुसाइड शहर या नावानं ओळखलं जातं आहे.
कोटामध्ये प्रत्येक वर्षाकाठी जवळपास 24 जणांनी सुसाइड केल्याची नोंद होतेय. दोन डझनांहून अधिक आत्महत्यांची या शहरात आतापर्यंत नोंद झाली. मात्र या सुसाइड थांबवण्यासाठी कोणतीही सरकारी अथवा पोलीस यंत्रणा कामी आली नाही. या शहरानं अनेक डॉक्टर आणि इंजिनीअर घडवले. अनेकांना यशोशिखरावर पोहोचवणा-या या शहराला आत्महत्यांच्या सत्रामुळे सुसाइट शहर अशी ओळख मिळाली आहे.
शिक्षणासाठी राजस्थानातलं कोटा शहर परिचित आहे. या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र आता शैक्षणिक संस्थांचं शहर सुसाइट शहर या नावानं ओळखलं जाऊ लागलं आहे. इथं शैक्षणिक संस्था असल्यानं अध्यापनासाठी अनेक मुलं येतात. सूत्रांच्या माहितीनुसार, शैक्षणिक संस्थेतील शिक्षण माफियांमुळे विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची माहिती समोर येते आहे. काही विद्यार्थी फाशी घेऊन, काही विद्यार्थी विष पिऊन, तर काही विद्यार्थी हाताच्या नसा कापून आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आत्महत्या थांबवण्यासाठी आता तरी राजस्थान सरकारनं जागं होण्याची गरज आहे.