पाकमध्ये होणा-या राष्ट्रकुल बैठकीवर भारताचा बहिष्कार
By admin | Published: August 7, 2015 06:12 PM2015-08-07T18:12:11+5:302015-08-07T19:29:34+5:30
पाकिस्तानमध्ये होणा-या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने शुक्रवारी घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - पाकिस्तानमध्ये होणा-या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने शुक्रवारी घेतला आहे.
पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये ६१ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेचे आयोजन ३० सप्टेंबर ते ८ आक्टोंबरच्या दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेचे पाकिस्तानकडून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह इतर राज्यातील विधानसभा अध्यक्ष्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना या परिषदेचे आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयाचे स्वागत असून हा एक प्रकारचा जगाला संदेश असल्याचे जम्मू-काश्मीरचे विधानसभा अध्यक्ष कवींद्र गुप्ता यांनी म्हटले आहे.