भारताचे चोख प्रत्युत्तर : पाकिस्तानचे दोन सैनिक ठार, 14 चौक्या उद्ध्वस्त
By admin | Published: November 1, 2016 06:58 PM2016-11-01T18:58:03+5:302016-11-01T18:58:03+5:30
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मंगळवारी सात नागरिक ठार झाल्याने संतप्त झालेल्या भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मंगळवारी सात नागरिक ठार झाल्याने संतप्त झालेल्या भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले असून, त्यांच्या 14 चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
जम्मूमधील अरनिया आणि रामगड विभागात केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानी रेंजर्सच्या 14 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. तत्पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सात नागरिकांना मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. अरनियामधील गोळीबारात तीन भारतीय नागरिक जखमी झाले होते.
पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर येथील रामगड येथील नागरिकांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती एका अधिका-याने दिली आहे.
मंगळवारी पहाटे 5 पासून पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू केला.त्यात काश्मीरमधील आर.एस. पुरा जिल्ह्यातील अरनिया सेक्टरमधील गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून आतापर्यंत 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय जवान पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.
BSF targeted Pakistan Rangers posts across International Border and caused heavy damage to around 14 Pak posts in retaliatory fire: BSF
— ANI (@ANI_news) November 1, 2016