चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी करणार चंद्राकडे प्रयाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 02:39 PM2019-06-12T14:39:38+5:302019-06-12T14:52:17+5:30
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहुर्त अखेर निश्चित झाला आहे.
हैदराबाद - भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. यासंदर्भातील माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवान यांनी दिली आहे. दरम्यान, चंद्रावर जाणाऱ्या चांद्रयान-२ ची काही छायाचित्रे इस्रोने प्रसारित केली आहेत.
Indian Space Research Organisation Chairman Dr. K Sivan: ISRO has firmed up that Chandrayaan 2 Mission will be launched on July 15 early morning at 2 hours 51 minutes. pic.twitter.com/E64eBaZfu7
— ANI (@ANI) June 12, 2019
चांद्रयान-२ मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लँडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही एमके lll अंतराळात घेऊन जाईल. विशेष म्हणजे हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे.
ISRO Chairman Dr. K Sivan: The Chandrayaan 2 Mission contains three components & the composite body of Chandrayaan 2 is kept inside GSLV MK-III. The total mass of Chandrayaan 2 system is 3.8 ton; out of 3.8 ton, nearly 1.3 ton is the propeller. https://t.co/qCJSY5ltgW
— ANI (@ANI) June 12, 2019
चांद्रयान-२ च्या लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान नाव देण्यात आले आहे. रोव्हर प्रज्ञानला लँडर विक्रमच्या आत ठेवण्यात येईल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे लँडिंग झाल्यानंतर त्याला बाहेर आणले जाईल.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ऑर्बिटर मोहिमेदरम्यान चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. नंतर हे ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या पृष्टभागावर पोहोचल्यानंतर सहा चाके असलेला प्रज्ञान नाव असलेला रोव्हर पृष्टभागावर उतरेल. इस्रोचे शास्रज्ञ पृथ्वीवरून या रोव्हरचे नियंत्रण करणार आहेत. भारताच्या चांद्रमोहिमेला पुढे घेऊन जाण्याबरोबरच चांद्रयान-२ अंतराळ संस्थांची मदत देखील करणार आहे.
भारताने २००९ मध्ये चांद्रयान-१ चंद्रावर पाठवले होते. मात्र त्यामध्ये रोव्हरचा समावेश नव्हता. आता दहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारताने चांद्र मोहीम हाती घेतली असून, चांद्रयान-२ चे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे.