आयसीसीच्या गुगलीवर भारत क्लीन बोल्ड, फक्त श्रीलंकेचा पाठिंबा

By Admin | Published: February 5, 2017 10:26 AM2017-02-05T10:26:27+5:302017-02-05T10:27:01+5:30

आयसीसी स्वतःच्या आर्थिक आणि प्रशासकीय चौकटीत बदल करण्याच्या तयारीत आहे.

India's Clean Bold on ICC's Google Play, Only Sri Lanka's Support | आयसीसीच्या गुगलीवर भारत क्लीन बोल्ड, फक्त श्रीलंकेचा पाठिंबा

आयसीसीच्या गुगलीवर भारत क्लीन बोल्ड, फक्त श्रीलंकेचा पाठिंबा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - आयसीसी स्वतःच्या आर्थिक आणि प्रशासकीय चौकटीत बदल करण्याच्या तयारीत आहे. आयसीसीच्या आर्थिक मॉडेलमध्ये बदल केल्यास भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मिळणार सर्वाधिक महसूल घटणार आहे. दुबईमध्ये आयसीसीच्या झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं प्रस्तावित बदलांचा पूर्ण ताकदीनिशी विरोध केला होता. मात्र भारताला यात इतर देशांचा पाठिंबा न मिळाल्यानं तो एकटा पडला. त्यामुळे आयसीसीतील नव्या बदलांवर एप्रिलमध्ये होणा-या बोर्डाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

बिग थ्री मॉडेलच्या विरोधात भारताला फक्त श्रीलंकेनं पाठिंबा दिला असून, इतर 7 देशांतील सदस्यांनी या बदलाला समर्थन दिलं आहे. या देशांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचाही सहभाग आहे. झिम्बाब्वे या देशानं मतदानात सहभाग घेतला नाही, तर न्यूझीलंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं बदल करण्याच्या बाजूनं मतदान केलं आहे. भारतासोबत नेहमीच असणा-या बांगलादेशनंही या बदलांना समर्थन दिलं आहे.

आयसीसीच्या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व वरिष्ठ बँकर विक्रम लिमये करत होते. लिमये म्हणाले, आम्ही आयसीसीच्या हा बदलांना स्वीकारू शकत नाही. मला या दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. त्यावर मनोहर यांनी ब-याच महिन्यांपासून मी वाटत पाहत असल्याचं सांगितलं. सध्याच्या मॉडेलनुसार आयसीसीच्या ग्लोबल महसुलात भारताला 20.3 टक्के इतका फायदा मिळतो. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांना तो घटवून 8 टक्क्यांवर आणायचा आहे. मात्र त्याला बीसीसीआयचा विरोध आहे. 

Web Title: India's Clean Bold on ICC's Google Play, Only Sri Lanka's Support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.