'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 08:42 PM2024-09-01T20:42:22+5:302024-09-01T20:46:35+5:30

भारतीय नौदलात आण्विक पाणबुडी INS अरिघाट सामील झाली आहे.

'India's defense minister is strong...', Pakistani defense expert praised Rajnath Singh | 'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक

'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक

India on Terrorism : दहशतवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान आणि भारतीय भूमीवर कब्जा करणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. या अंतर्गत गुरुवारी(29 ऑगस्ट) अरिहंत वर्गाची दुसरी आण्विक पाणबुडी, INS अरिघाट विशाखापट्टणम येथील नौदल ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. दरम्यान, आता यावरुन पाकिस्तान आणि चीनचे सुरक्षा तज्ज्ञ भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे कौतुक करत आहेत.

पाकिस्तानने संरक्षण मंत्री काय म्हणाले?
भारताच्या वाढत्या आण्विक सामर्थ्यावर पाकिस्तानी संरक्षण तज्ञ कमर चीमा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही ठिकाणांहून भारत अण्वस्त्र हल्ले करू शकतो. आपली सुरक्षा लक्षात घेऊन भारत तिन्ही सैन्यात मोठी गुंतवणूक करत आहे. भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत. भारताने हा संदेशही दिला आहे की, पीएम मोदी फक्त एकच आण्विक पाणबुडी घेऊन येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया कमर चीमाने दिली.

कशी आहे पाणबुडी
अरिहंत वर्गाची दुसरी पाणबुडी अरिघाटाची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे आणि ही अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली आणि उपकरणांनी सुसज्ज आहे. याची लांबी 112 मीटर, रुंदी 11 मीटर आणि वजन सुमारे 6 हजार टन आहे. ही घातक K-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून, याची मारक क्षमता 750 किलोमीटरपर्यंत आहे. मात्र, यातून आपल्या देशाला कोणताही धोका नसल्याचा दावाही पाकिस्तानी तज्ज्ञांनी केला आहे.

भारताच्या सामर्थ्याला चीनही घाबरला
चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेही आयएनएस अरिघाटबद्दल एक लेख लिहिला आहे. या लेखाच्या मथळ्यात भारताने या आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडीचा जबाबदारीने वापर करायला हवा, असे लिहिले आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखात लिहिले की, अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्यांमुळे भारताची अणुशक्ती वाढली आहे. याचा उपयोग शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी केला पाहिजे, ताकद दाखवण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी नाही.

Web Title: 'India's defense minister is strong...', Pakistani defense expert praised Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.