मोदींच्या परदेश दौ-यातून भारताची १९ अब्ज डॉलर्सची कमाई

By admin | Published: August 6, 2015 09:51 AM2015-08-06T09:51:57+5:302015-08-06T12:20:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यांमधून भारतात तब्बल १९.७८ अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

India's earnings of $ 19 billion from Modi's overseas tour | मोदींच्या परदेश दौ-यातून भारताची १९ अब्ज डॉलर्सची कमाई

मोदींच्या परदेश दौ-यातून भारताची १९ अब्ज डॉलर्सची कमाई

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.  ६ - सत्तेवर आल्यापासून वारंवार परदेश दौ-यावर जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चोहोबाजूंनी टीका होत असली तरी मोदींच्या या दौ-यांमध्ये भारतात तब्बल १९.७८ अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 

परदेशी गुंतवणुकीसंदर्भात राज्यसभेत उपस्थित झालेल्या एका प्रश्नावर वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारमन यांनी उत्तर देताना गेल्या वर्षभरातील परदेशी गुंतवणुकीची माहिती सादर केली. मोदींनी गेल्या वर्षभरात ज्या १२ देशांचे दौरे केले या दौ-यांमधून भारतात १९.७८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. तर या दौ-यात भारताने संबंधीत देशांमध्ये ३.४२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. २०१४ -१५ या कालावधीत भारताने परदेशात गुंतवणूक करण्याचे प्रमाण ६.४२ अब्ज डॉलर्स एवढे झाले असून परदेशातून भारतात होणा-या गुंतवणूकीचे प्रमाण ७५. ७१ अब्ज डॉलर्स ऐवढे झाले आहे. इतकेच नव्हे तर या कालावधीत भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली असून हे प्रमाण आता ३०.९२ अब्ज डॉलर्स झाल्याची माहिती सीतारमन यांनी संसदेत दिली आहे. 

 

Web Title: India's earnings of $ 19 billion from Modi's overseas tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.