चीनच्या प्रत्येक सैनिकावर भारताचा डोळा; सीमाभागात आयटीबीपी स्थापन करणार बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 06:12 AM2023-10-03T06:12:43+5:302023-10-03T06:12:54+5:30

पूर्व लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये दोन्ही देशांतील  तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

India's eye on every Chinese soldier; Border Intelligence Post to be set up by ITBP in border areas | चीनच्या प्रत्येक सैनिकावर भारताचा डोळा; सीमाभागात आयटीबीपी स्थापन करणार बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट

चीनच्या प्रत्येक सैनिकावर भारताचा डोळा; सीमाभागात आयटीबीपी स्थापन करणार बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट

googlenewsNext

मागो : लडाख ते अरुणाचल प्रदेशालगत असलेल्या सीमाभागात चिनी लष्करावर बारीक लक्ष ठेवण्याकरिता, तसेच गुप्तवार्ता मिळविण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट (बीआयपी) स्थापन करणार आहे. तेथे गुप्तचर अधिकाऱ्यांचे पथके तैनात करण्यात येतील. पूर्व लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये दोन्ही देशांतील  तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

चीनने काढल्या भारताच्या कुरापती

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी लष्कराबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. गेल्या वर्षी ९ डिसेंबरला अरुणाचल प्रदेशमधील यांगत्से येथे चिनी लष्कराने घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. भारतीय हद्दीत आयटीबीपीच्या १८० सीमा चौक्या आहेत. आणखी ४५ सीमा चौक्या उभारण्यात येणार आहे.

अरुणाचलमधील ६६५ गावांचा होणार विकास

व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्रॅम (व्हीव्हीपी) या योजनेच्या अंतर्गत सर्व राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेशमधील

सर्वाधिक गावांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी अरुणाचल प्रदेशमधील ६६५ गावे निवडण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ४५३ गावांचा विकास करण्यात येईल, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनी नुकतीच दिली होती.

Web Title: India's eye on every Chinese soldier; Border Intelligence Post to be set up by ITBP in border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन