भारताची अंतराळातून पाकिस्तान-चीनवर राहणार नजर, इस्रोचा NAVIC उपग्रह लॉन्च; जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 01:34 PM2023-05-29T13:34:17+5:302023-05-29T13:35:32+5:30

या उपग्रहाद्वारे भारतासह आजूबाजूचा सुमारे 1500 किलोमीटरचा परिसर निगराणीखाली येईल.

India's eye on Pakistan-China from space, ISRO's NAVIC satellite launch | भारताची अंतराळातून पाकिस्तान-चीनवर राहणार नजर, इस्रोचा NAVIC उपग्रह लॉन्च; जाणून घ्या माहिती...

भारताची अंतराळातून पाकिस्तान-चीनवर राहणार नजर, इस्रोचा NAVIC उपग्रह लॉन्च; जाणून घ्या माहिती...

googlenewsNext

ISRO:भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(ISRO) सोमवारी (29 मे) GPS म्हणजेच नॅव्हिगेशन सेवा वाढविण्यासाठी न्यू जनरेशन सॅटेलाईट नाविक (NAVIC) लॉन्च केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केलेल्या GSLV-F12 रॉकेटमधून हे NVS-1 सॅटेलाईट लॉन्च करण्यात आले. दोन हजार किलो वजन असलेले या सॅटेलाईटमुळे भारताची नॅव्हिगेशन आणि टेहळणी क्षमता वाढेल. हे यान अंतराळात यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले आहे.

NVS-01 बनेल भारताचा 'डोळा'
NVS-01 द्वारे भारताची नॅव्हिगेशन प्रणाली आणखी मजबूत केली जाईल. यासोबतच देशाच्या सीमांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. अंतराळात या उपग्रहाच्या यशस्वी प्रस्थापनामुळे चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांवर लक्ष ठेवता येणार आहे. दोन्ही देश भारतीय सीमेवर सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. 

NVS-01 च्या माध्यमातून भारत शेजारी देशांच्या नापाक कारवायांना वेळीच प्रत्युत्तर देऊ शकेल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना रस्ता दाखवण्यासाठी इस्रोचा NAVIC उपग्रह देशाचा डोळा म्हणून काम करेल. या उपग्रहाद्वारे भारतासह आजूबाजूचा सुमारे 1500 किलोमीटरचा परिसर निगराणीखाली येईल. या उपग्रहासोबतच इस्रोने प्रथमच स्वदेशी बनावटीचे रुबिडियम अणु घड्याळही प्रक्षेपित केले आहे.

NAVIC म्हणजे काय?
स्वदेशी नेव्हिगेशन सॅटेलाइट (NAVIC) ISRO ने विकसित केले आहे. हा सात उपग्रहांचा समूह आहे, जो अवकाशात ग्राउंड स्टेशन म्हणून काम करेल. हे नेटवर्क सामान्य लोकांपासून ते लष्करी दलांपर्यंत, अनेकांना नॅव्हिगेशनल सेवा प्रदान करेल. भारतातील विमान वाहतूक क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता ही प्रणाली उत्तम नॅव्हिगेशन, वेळ आणि स्थान निश्चित करण्यात मदत करेल.
 

Web Title: India's eye on Pakistan-China from space, ISRO's NAVIC satellite launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.