देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:57 PM2024-09-26T20:57:46+5:302024-09-26T20:58:49+5:30

Air Train : जगभरातील कोण-कोणत्या देशांमध्ये एअर ट्रेनची सुविधा आहे? याबद्दल जाणून घ्या....

India's first air train to start in Delhi; Which countries in the world have 'this' facility? | देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?

देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?

नवी दिल्ली : विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतातील पहिली एअर ट्रेन येत्या काळात दिल्लीविमानतळावर सुरू होणार आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का? जगभरातील कोण-कोणत्या देशांमध्ये एअर ट्रेनची सुविधा आहे? याबद्दल जाणून घ्या....

दिल्ली विमानतळावर सुरू होणार एअर ट्रेन...
राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. दिल्ली विमानतळावरून दररोज हजारो प्रवासी विमानातून प्रवास करतात. यामध्ये मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे, ज्यांच्याकडे कनेक्टिंग फ्लाइट असते किंवा जे विमानतळाच्या टर्मिनल १ वर पोहोचतात आणि नंतर टर्मिनल २ किंवा ३ वर जाण्यासाठी रस्तेमार्गाचा वापर करतात. मात्र आगामी काळात अशा प्रवाशांना एअर ट्रेनमधून एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर सहज जाता येणार आहे.

दिल्लीतील एअर ट्रेनचा रुट कसा असेल?
एअर ट्रेन सुरू झाल्यास विमान प्रवासी ट्रॅफिकमध्ये न अडकता काही मिनिटांत टर्मिनल ३ आणि टर्मिनल २ पर्यंत पोहोचू शकतात. या एअर ट्रेनच्या मार्गाची एकूण लांबी ७.७ किलोमीटर असणार आहे. योजनेनुसार, या एअर ट्रेनचे टर्मिनल १, टर्मिनल २ आणि टर्मिनल ३ तसेच एरोसिटी आणि कार्गो सिटी असे थांबे असतील. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प २०२७ च्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी डायलने निविदाही काढली असून या निविदेची निविदा प्रक्रियाही ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास दोन हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

'या' देशांमध्ये सुरू आहे एअर ट्रेन
येत्या काही वर्षांत भारतातील पहिली एअर ट्रेन दिल्ली विमानतळावर धावणार आहे. दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये अजूनही एअर ट्रेन धावतात. ज्यामध्ये चीन, न्यूयॉर्क, जपानसह अनेक देशांची नावे आहेत.

कशी धावते एअर ट्रेन?
एअर ट्रेनला ऑटोमेटेड पीपल मूव्हर असेही म्हणतात. एक स्वयंचलित ट्रेन प्रणाली, ज्याचा उपयोग विविध टर्मिनल्स आणि विमानतळावरील इतर महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यासाठी केला जातो. माहितीनुसार, भारतात सुरू होणारी एअर ट्रेन एकतर पीलर आणि स्लॅबच्या आधारे हवेत धावणारी मोनोरेल असेल किंवा ती जमिनीवर धावणारी 'ऑटोमॅटिक पीपल मूव्हर एअर ट्रेन' असू शकते.

Web Title: India's first air train to start in Delhi; Which countries in the world have 'this' facility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.