भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स मनोहर ऐच यांचे निधन
By admin | Published: June 6, 2016 10:07 AM2016-06-06T10:07:20+5:302016-06-06T10:07:47+5:30
भारतातर्फे पहिल्यांदाच मिस्टर युनिव्हर्सचा खिताब जिंकरणारे १०४ वर्षीय बॉडीबिल्डर मनोहर ऐच यांचे रविवारी निधन झाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ६ - भारतातर्फे पहिल्यांदाच मिस्टर युनिव्हर्सचा खिताब जिंकरणारे १०४ वर्षीय बॉडीबिल्डर मनोहर ऐच यांचे रविवारी निधन झाले. १९५२ साली त्यांनी मिस्टर युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
मनोहर ऐच यांनी 'पॉकेट हर्क्युलिस' असे संबोधण्यात येत असे. अवघी ४ फूट ११ इंच उंची असूनही चांगले शरीर कमावले होते. भारतीय वायुदलात काम करणा-या ऐच यांनी ३० व्या वर्षी म्हणजेच १९४२ साली वेट लिफ्टिंग करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर दशकभराने त्यांनी 'मिस्टर युनिव्हर्स'चा खिताब जिंकला. मनोहर यांनी तीनवेळा एशियम गेम्समध्ये सुवर्णपदकही जिंकले. त्यांचा शेवटचा बॉडी बिल्डिंग शो २००३ साली झाला होता.