एम.सत्यवती बनल्या भारताच्या पहिल्या महिला डीजीसीए

By admin | Published: December 31, 2014 09:17 PM2014-12-31T21:17:07+5:302014-12-31T21:17:14+5:30

नागरी विमान वाहतूक महासंचालकपदी (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) एम.सत्यवती यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या रुपाने या पदी प्रथमच एक महिला विराजमान होणार आहे.

India's first woman DGCA became M. Satyavati | एम.सत्यवती बनल्या भारताच्या पहिल्या महिला डीजीसीए

एम.सत्यवती बनल्या भारताच्या पहिल्या महिला डीजीसीए

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - नागरी विमान वाहतूक महासंचालकपदी (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) एम.सत्यवती यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या रुपाने या पदी प्रथमच एक महिला विराजमान होणार आहे.  १८८२ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या श्रीमती सत्यवती या सध्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाल अतिरिक्त सचिव तसेच आर्थिक सल्लागारपदी कार्यरत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्व विमानतळांची  देखरेख डीजीसीएच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे हा विभाग अत्यंत संवेदनशील मानला जातो. अशा महत्वपूर्ण पदावर विराजमान होण्याचा बहुमान सत्यवती यांना मिळालेला आहे. 
५६ वर्षीय सत्यवती यांच्या निवृत्तीचा कालावधी २०१७ पर्यंत असला तरी, महासंचालकपदी त्या काही महिनेच राहतील अशी शक्यता आहे. लवकरच त्यांना सचिवपदाचा दर्जा मिळणे अपेक्षित असून त्यानंतर येथून त्यांची बदली होईल.

Web Title: India's first woman DGCA became M. Satyavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.