मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 07:39 AM2024-10-05T07:39:07+5:302024-10-05T07:40:28+5:30
ऑगस्टमध्ये या परिषदेत सहभागी हाेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे शांघाय सहयाेग संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी हाेण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार आहे. ही परिषद १५ आणि १६ ऑक्टाेबरला इस्लामाबाद येथे हाेणार आहे. सुमारे ९ वर्षांनी प्रथमच भारताचे परराष्ट्र मंत्री पाकचा दाैरा करणार आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज यांनी डिसेंबर २०१५मध्ये एका संमेलनासाठी पाकिस्तान दाैरा केला हाेता.
परराष्ट्र प्रवक्ता रणधीर जायस्वाल यांनी यासंदर्भात सांगितले की, परराष्ट्र मंत्री हे केवळ एससीओ परिषदेत सहभागी हाेण्यासाठीच पाकिस्तानात जाणार आहेत. ते भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.
ऑगस्टमध्ये या परिषदेत सहभागी हाेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले हाेते. जयशंकर यांचा पाकिस्तान दाैरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्यावर्षी भारताने एससीओ बैठकीचे ऑनलाईन आयाेजन केले हाेते.
माेईज्जू भारतात येणार
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष माेहम्मद माेईज्जू हे ६ सप्टेंबरपासून ५ दिवसांच्या भारत दाैऱ्यावर येणार आहेत. माेईज्जू यांचा हा पहिलाच द्विपक्षीय भारत दाैरा आहे. या दाैऱ्यात ते माेदी यांच्यासाेबत द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील.