भारताचे जी-२०चे अध्यक्षपद दुफळी दूर करण्याचा प्रयत्न, अडथळे संपविणार- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:03 PM2023-09-08T12:03:09+5:302023-09-08T12:03:16+5:30

पंतप्रधान मोदी : परिषद ‘लोक चळवळ’; अडथळे संपविणार

India's G-20 presidency will try to eliminate factionalism, will end the obstacles - PM Narendra Modi | भारताचे जी-२०चे अध्यक्षपद दुफळी दूर करण्याचा प्रयत्न, अडथळे संपविणार- पंतप्रधान मोदी

भारताचे जी-२०चे अध्यक्षपद दुफळी दूर करण्याचा प्रयत्न, अडथळे संपविणार- पंतप्रधान मोदी

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेला ‘लोक चळवळ’ असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, या माध्यमातून दुफळी दूर करणे, अडथळे दूर करणे आणि सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामागील कल्पना अशी आहे की, एक असे जग निर्माण करणे जिथे एकता सर्व मतभेदांपेक्षा श्रेष्ठ असेल. 

मोदी यांनी म्हटले आहे की, याच विचारातून भारताने ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट’चेही आयोजन केले होते, ज्यामध्ये १२५ देश सहभागी झाले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या सर्वात महत्त्वाच्या उपक्रमांपैकी हा एक आहे. . 

आफ्रिकन युनियनला सहभागी करण्यास समर्थन : चीन
चीनने जी-२०मध्ये आफ्रिकन युनियन (एयू) चा समावेश करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले. हा पहिलाच देश आहे ज्यांनी संघटनेत आफ्रिकन गटाच्या समावेशाचे जोरदार समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आफ्रिकन युनियनला जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या जी-२०मध्ये पूर्ण सदस्य म्हणून समाविष्ट करण्यास समर्थन दिले आहे. आफ्रिकन युनियनमध्ये आफ्रिका खंडातील ५५ देश सहभागी आहेत.

डिनरला अंबानी आणि अदानी यांच्यासह ५०० उद्योजक   
उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह ५०० उद्योजक ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेनंतर डिनरला उपस्थित राहतील. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल, आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आदी प्रमुख उद्योजक उपस्थित राहणार आहेत. 

व्ही. के. सिंह करणार बायडेन यांचे आज स्वागत
केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज स्वागत करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन शुक्रवारी संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल होणार आहेत. ते रात्री पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या ताफ्यात ६० वाहने असणार आहेत. दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बायडेन हे सीक्रेट सर्व्हिसच्या ३०० कमांडोंच्या सुरक्षेत असतील.

रशिया, चीनचे राष्ट्राध्यक्ष अनुपस्थित 
या शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे उपस्थित राहणार नाहीत.

Web Title: India's G-20 presidency will try to eliminate factionalism, will end the obstacles - PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.