भारताचा वृद्धिदर घसरणार; नाणेनिधीने वर्तविला अंदाज

By admin | Published: January 18, 2017 01:09 AM2017-01-18T01:09:00+5:302017-01-18T01:09:00+5:30

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा जीडीपी वृद्धीचा चालू आर्थिक वर्षाचा अंदाज घटवून ६.६ टक्के केला आहे.

India's growth will fall; Treasury estimates | भारताचा वृद्धिदर घसरणार; नाणेनिधीने वर्तविला अंदाज

भारताचा वृद्धिदर घसरणार; नाणेनिधीने वर्तविला अंदाज

Next


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा जीडीपी वृद्धीचा चालू आर्थिक वर्षाचा अंदाज घटवून ६.६ टक्के केला आहे. आधी हा अंदाज ७.६ टक्के होता. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसल्याने भारताचा वृद्धिदर खाली येणार असल्याचे नाणेनिधीने म्हटले. नाणेनिधीने २0१६-१७ या वर्षासाठी चीनचा जीडीपी वृद्धीचा अंदाज मात्र वाढवून ६.७ टक्के केला आहे. आधी तो ६.५ टक्के दर्शविलेला होता.
नोटाबंदीचा प्रभाव संपल्यानंतर २0१७-१८ मध्ये अर्थव्यवस्था
सुरळीत होऊन भारताचा वृद्धिदर ७.२ टक्के होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. आधीच्या ७.६ टक्के या अंदाजापेक्षा हा दर अर्थातच कमी आहे. २0१८-१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर ७.७ टक्क्यांवर जाईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात आजपर्यंत नाणेनिधीने जागतिक नरमाईच्या पार्श्वभूमीवर भारताला चमकता तारा म्हटले होते. तथापि, जानेवारीतील अंदाजात नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>आर्थिक व्यवहारच ठप्प झाले होते !
जागतिक अर्थव्यवस्था दृष्टिक्षेप सुधारणा अहवाल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी जारी केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अनेक देशांसाठी नाणेनिधीने कॅलेंडर वर्षासाठी अंदाज दिला आहे. भारतासाठी मात्र, आर्थिक वर्षासाठी देण्यात आला आहे. नाणेनिधीने म्हटले की, चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २0१६-१७ साठी, तसेच त्यापुढील वर्षासाठी भारताचा वृद्धिदर अनुक्रमे १ टक्का आणि 0.४ टक्का कमी करण्यात आला आहे.नोटाबंदीमुळे
भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. नोटाबंदीमुळे रोख रकमेची टंचाई निर्माण झाली. पेमेंट व्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले.
>संयुक्त राष्ट्राला आशा
भारताचा विकासदर ७.७ टक्के राहील, असा अंदाज वर्तवत संयुक्त राष्ट्राच्या अहवालात भारताकडून वृद्धीच्या आशा असल्याचे स्पष्ट करण्यता आले आहे. भारत यंदा सर्वांत वेगाने प्रगती करणारा विकसनशील देश असेल असेही, अहवालात म्हटले आहे.
>नाणेनिधीचा अंदाज खरा ठरल्यास जगात सर्वाधिक वेगाने वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा किताब भारताला गमवावा लागणार आहे.

Web Title: India's growth will fall; Treasury estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.