सर्व मंगळ मांगल्ये भारताने रचला इतिहास
By admin | Published: September 25, 2014 05:52 AM2014-09-25T05:52:16+5:302014-09-25T05:52:16+5:30
श्रीहरीकोटा अंतराळ तळावरून गत ५ नोव्हेंबरला प्रक्षेपित केलेल्या ‘मार्स आॅर्बिटर मिशन’ अर्थात मंगळ यानाने आज बुधवारी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. या ऐतिहासिक यशाने संपूर्ण देशाचा ऊर भरून आला़
बंगळुरू : श्रीहरीकोटा अंतराळ तळावरून गत ५ नोव्हेंबरला प्रक्षेपित केलेल्या ‘मार्स आॅर्बिटर मिशन’ अर्थात मंगळ यानाने आज बुधवारी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. या ऐतिहासिक यशाने संपूर्ण देशाचा ऊर भरून आला़
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करून दाखवले़ या यशाला तोड नाही़ हे यश इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल.
-पंतप्रधान
मंगळ यान काय करणार?
वातावरणाचा अभ्यास करून सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे संकेत देणारा मिथेन वायू या ग्रहावर आहे का किंवा कधी एकेकाळी होता का याचा प्रामुख्याने शोध घेईल. ६८ कोटी कि.मी. अंतर यानाला मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी कापावे लागले.
नोव्हेंबर रोजी इस्रोने पीएसएलव्ही
सी-२५ अग्निबाणाद्वारे श्रीहरिकोटा येथून मंगळ यानाचे प्रक्षेपण केले होते. कौतुकाची थाप
मंगळ मोहीम फत्ते होताच पंतप्रधानांनी इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांची पाठ थोपटून त्यांचे कौतुक केले़ कोटी रुपये मंगळ मोहिमेचा खर्च. तरीही सर्वात स्वस्त.महिने हे यान मंगळाभोवती प्रदक्षिणा करीत राहील.सर्वात स्वस्त मंगळ मोहीम
भारताची मंगळ मोहीम सर्वाधिक स्वस्त मंगळ मोहीम ठरली़ या मोहिमेवर एकूण ४५० कोटी रुपये खर्च झाले़ नासाचे मंगळ यान ‘मावेन’ २२ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले़ भारताच्या मंगळ मोहिमेचा एकूण खर्च नासाच्या या मोहिमेवरील खर्चाच्या केवळ १० वा भाग होता़ मोजक्या देशांच्या पंक्तीत
पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला़ मंगळावर आपले यान पाठविणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीतही भारत विराजमान झाला़ 1350 कि.ग्रॅ. वजनाच्या
मंगळ यानावर पाच उपकरणे लागली आहेत़ यात एक सेन्सर, एक कलर कॅमेरा, एक थर्मल इमेजिंग स्पेक्ट्रोमीटरचा समावेश आहे़ सेन्सर
लाल ग्रहावरील जीवसृष्टीचा संकेत देणाऱ्या मिथेन वायूचा शोध घेईल़ कलम कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर मंगळाचा पृष्ठभाग तसेच त्यात असलेल्या खनिजांचा अभ्यास करेल़पंतप्रधानांच्या उपस्थितीत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मुख्य ४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटर (एलएएम) तसेच ८ लहान थ्रस्टर्स प्रज्वलित केले़ सर्वात महत्त्वाचा टप्पा समजला जाणारी ही प्रज्वलन प्रक्रिया सकाळी ७ वाजून १७ मिनिटाला सुरू झाली.